उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी सरकारकडून लसीकरणावर भर दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीस लस देण्यात येत आहे. दरम्यान, गराेदर मातांनाही आता लस देण्यात यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार आराेग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
१६ जानेवारी २०२१ पासून देशात काेविड लसीकरणास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात आराेग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. यानंतरच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला. हा टप्पा सरताे ना सरताे ताेच ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले हाेते. हे लसीकरण सुरू असतानाच आता स्तनदा व गराेदर माता यांना लस देण्यात येणार आहे. या अनुषंगाने आराेग्य विभागाकडून लसीकरणाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गराेदर मातांना लस घेणे सुरक्षित असल्याचे जाहीर झाल्याने त्यांना आता काेविन पाेर्टलवर नाेंदणी करणे शक्य हाेईल. दरम्यान, जिल्ह्यातील अधिकाधिक गराेदर मातांनी आपले नाव नाेंदवून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आराेग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
चाैकट...
थाेडेबहुज जाणवतात परिणाम...
प्रत्येक औषधांचे आणि लशींचे इतरांमध्ये जसे छाेटे परिणाम जाणवतात, तसेच गराेदर मातांनाही जाणवू शकतात, असे ‘आराेग्य’चे म्हणणे आहे. त्यात हात दुखणे, अंगदुखी, हलकासा ताप यासारखी लक्षणे जाणवू शकतात. अगदी काही मातांना २० दिवसांपर्यंत ही छाेटी लक्षणे जाणवू शकतात. अशा मातांना तातडीने वैद्यकीय मदत घेऊन उपचार घेता येतील. गराेदर मातांसाठी सर्वांत माेठी काळजी म्हणजे त्यांचे बाळ. मात्र, काेविड हाेऊन गेलेल्या जवळपास ९५ टक्के मातांच्या बाळांचे आराेग्य सुरक्षित राहिल्याचा दावा करण्यात येत आहे.
गराेदर मातांनी लस घेण्यापूर्वी...
काेराेनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप धाेका टळलेला नाही. असे असतानाच तिसरी लाट येईल, असे भाकीत केले जात आहे. परिणामी शासनाकडूनही टप्प्या-टप्याने लसीकरण वाढविण्यात येत आहे. स्तनदा मातांपाठाेपाठ आता गराेदर मातांनाही काेविड लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आराेग्य यंत्रणेला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कार्यवाहीही सुरू झाली आहे. असे असले तरी ३५ वर्षांवरील मातांनी लस घेताना त्यांना असलेल्या सहव्याधींची माहिती उपस्थित डाॅक्टरांना देणे बंधनकारक आहे.
काेट...
स्तनदा मातांना काेराेना लस देण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सरकारकडून सादर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना तालुका,आराेग्य केंद्रांपर्यंत पाेहाेचविल्या आहेत. या सूचनांनुसारच गराेदर मातांचे लसीकरण हाेईल. एकही गराेदर माता काेराेना लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याबाबत सांगितले आहे.
-डाॅ. कुलदीप मिटकरी, अतिरक्त जिल्हा आराेग्य अधिकारी, जिल्हा परिषद.
ग्राफ...
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण
२८.४५ टक्के