शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

१९४ मतदान केंद्राचा भार ७७६ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

कळंब : तालुक्यातील ५९ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग सज्ज असून, उपरोक्त गावांत १९४ मतदान केंद्राचा भार ...

कळंब : तालुक्यातील ५९ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग सज्ज असून, उपरोक्त गावांत १९४ मतदान केंद्राचा भार तब्बल ७७६ कर्मचारी सांभाळणार आहेत.

कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी गावोगावी राजकीय हालचालीने चांगलाच वेग घेतला आहे. एकीकडे गावगाड्यात बैठका, चर्चेच्या फेऱ्या अंतिम टप्प्यात आल्या असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मतदान घ्यायची वेळ येणार आहे, असे गृहीत धरून प्रशासकीय पातळीवर मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.

यासाठी कळंब तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग कार्यशील असून मतदान केंद्रावरील भौतिक सुविधांच्या उपलब्धतेपासून प्रशिक्षित मनुष्यबळ उभे करण्यासाठी नियोजन केले आहे. विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना याकामी जुंपण्यात आले आहे.

त्यांची नियुक्ती, प्रशिक्षण कार्यवाही, नियम व निर्देशांची माहिती देणे याविषयी तालुकास्तरावर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तहसीलदार मंजूषा लटपटे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अस्लम जमादार यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

चौकट...

५९ ग्रामपंचायती

तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ५९ ग्रामपंचायतींचे एकूण १८८ प्रभाग आहेत. यातून ४९५ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी १८८ मतदान केंद्र व सहा सहाय्यक मतदान केंद्र राहणार आहेत. ईटकूर व येरमाळा येथील प्रत्येकी तीन प्रभागांत हे सहाय्यक मतदान केंद्र राहणार असल्याने मतदान केंद्राची संख्या १९४ राहणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र अधिकारी व तीन मतदान अधिकारी अशी बुथवरील रचना राहणार आहे. यानुसार तालुक्यात ७७६ कर्मचारी प्रत्यक्ष केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. यासाठी जि. प. शिक्षक व खाजगी संस्थांतील कर्मचारी राहणार आहेत.

१५ झोनल अधिकारी

कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी १५ झोनल अधिकारी कार्यरत राहणार आहेत. याशिवाय २२ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना २२ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक मदत करत आहेत.