शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

१९४ मतदान केंद्राचा भार ७७६ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

कळंब : तालुक्यातील ५९ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग सज्ज असून, उपरोक्त गावात १९४ मतदान केंद्राचा भार ...

कळंब : तालुक्यातील ५९ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग सज्ज असून, उपरोक्त गावात १९४ मतदान केंद्राचा भार तब्बल ७७६ कर्मचारी सांभाळणार आहेत.

कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी गावोगावी राजकीय हालचालीने चांगलाच वेग घेतला आहे.

एकीकडे गावगाड्यात बैठका, चर्चेच्या फेऱ्या अंतिम टप्प्यात आल्या असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मतदान घ्यायची वेळ येणार आहे, असे गृहीत धरून प्रशासकीय पातळीवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.

यासाठी कळंब तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग कार्यशील असून मतदान केंद्रावरील भौतिक सुविधांच्या उपलब्धतेपासून प्रशिक्षित मनुष्यबळ उभे करण्यासाठी नियोजन केले आहे. विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना याकामी जुंपण्यात आले आहे.

त्यांची नियुक्ती, प्रशिक्षण कार्यवाही, नियम व निर्देशांची माहिती देणे याविषयी तालुकास्तरावर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तहसीलदार मंजूषा लटपटे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अस्लम जमादार यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

चौकट...

५९ ग्रामपंचायती

तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ५९ ग्रामपंचायतींचे एकूण १८८ प्रभाग आहेत. यातून ४९५ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी १८८ मतदान केंद्र व सहा सहाय्यक मतदान केंद्र राहणार आहेत. ईटकूर व येरमाळा येथील प्रत्येकी तीन प्रभागांत हे सहाय्यक मतदान केंद्र राहणार असल्याने मतदान केंद्राची संख्या १९४ राहणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र अधिकारी व तीन मतदान अधिकारी अशी बूथवरील रचना राहणार आहे. यानुसार तालुक्यात ७७६ कर्मचारी प्रत्यक्ष केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. यासाठी जि. प. शिक्षक व खासगी संस्थांतील कर्मचारी राहणार आहेत.

१५ झोनल अधिकारी

कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी १५ झोनल अधिकारी कार्यरत राहणार आहेत. याशिवाय २२ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना २२ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक मदत करत आहेत.