शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! वाहनांखाली जॅक टाकून चाेरट्यांकडून लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST

येरमाळा (जि. उस्मानाबाद) : लग्नकार्य आटाेपून पंढरपूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबियाच्या भरधाव कारखाली चाेरट्यांनी जॅक टाकला. गाडीच्या खाली काही तरी ...

येरमाळा (जि. उस्मानाबाद) : लग्नकार्य आटाेपून पंढरपूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबियाच्या भरधाव कारखाली चाेरट्यांनी जॅक टाकला. गाडीच्या खाली काही तरी वाजू लागल्यानंतर चालकाने कार थांबविली. तेवढ्यात अंधारात दबा धरून बसलेल्या दराेडेखाेरांनी कारला गराडा घालून आतील लाेकांना चाकूचा धाक दाखवित काठीने मारहाण केली. यानंतर महिला, पुरूषांच्या अंगावरील दागिने तसेच राेख रक्कम मिळून सुमारे ७ लाख १२ हजारांचा ऐवज लंपास केला. ही थरारक घटना साेमवारी मध्यरात्री साेलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गारील नाथवाडी पाटीनजीक घडली.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, साेलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील लाड कुटुंबीय लग्नकार्यासाठी कारमधून (क्र. एमएच १३ सीएस ७३०८) अकाेला येथे गेले हाेते. हा साेहळा आटाेपल्यानंतर लाड कुटुंबीय साेमवारी रात्री साेलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गाने पंढरपूरकडे जात हाेते. ते नाथवाडी पाटीनजीक आले असता कारखाली कशाचा तरी आवाज आला. त्यामुळे कार थांबवून चालक खाली उतरला असता, रस्त्याच्या कडेला अंधारात दबा धरून बसलेल्या अज्ञात सहाजणांनी चालकास चाकू, काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर काहींनी कारमधील दाेन महिला व तीन पुरूषांकडील साेन्याच्या ३१ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या, ४१ ग्रॅम वजनाचे गंठण, ३५ ग्रॅमची चेन, ७० ग्रॅमचा साेन्याचा हार असे एकूण २० ताेळे साेने, ४७ हजार ५०० रुपये किमतीचे चार माेबाईल व राेख ६१ हजार रुपये असे एकूण सुमारे ७ लाख १२ हजार सहाशे रुपये लुटून अवघ्या अर्ध्या तासात दराेडेखाेर पसार झाले. याप्रकरणी निखिल विजय लाड (रा. पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पाेलीस ठाण्यात अज्ञात सहाजणांविरूद्ध २९ डिसेंबर राेजी दराेड्याचा गुन्हा नाेंदविण्यात आला. या घटनेमुळे वाहनधारकांसाेबतच परिसरातील लाेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चाैकट...

एकाच क्रमांकाच्या दाेन दुचाकी...

येरमाळा पाेलीस पंचनाम्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांना तेथे एकाच क्रमांकाच्या दाेन दुचाकी आढळून आल्या. त्यामुळे सदरील दुचाकी काेणाच्या नावे आहेत? काेठून आणल्या आहेत? याचा पाेलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

291220\29osm_1_29122020_41.jpg

येरमाळा पाेलिसांनी मंगळवारी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यावेळी एकाच क्रमांकाच्या दाेन दुचाकी घटनास्थळी आढळून आल्या.