शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

गुणवंत जाधवर उमरगा : प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे लग्न समारंभ असतो. हा क्षण कॅमेरात टिपणे अनेक वर्षांपासून सुरू ...

गुणवंत जाधवर

उमरगा : प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे लग्न समारंभ असतो. हा क्षण कॅमेरात टिपणे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात आता ड्रोनद्वारे शूटिंग करण्यास पसंती वाढत आहे. त्यातही प्री-वेडिंग शूटिंगसाठी ड्रोनचा अधिक वापर केला जातो. मात्र ड्रोनचा वापर करताना ते योग्यरित्या उडविता येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दक्षता म्हणून ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे, त्यांच्याकडून शूटिंग केल्यास धोका कमी होतो. मात्र, ही बाब अनेकजण गांभिर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.

ड्रोनद्वारे शूटिंग करायचीच असेल तर प्रशिक्षित ड्रोनचालकाकडूनच ती करणे गरजेचे आहे. नुकत्याच जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या कार्यालयावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला असून, याच अनुषंगाने संवेदनशील ठिकाणी विनापरवाना ड्रोन विक्री आणि उडवण्यास बंदी आहे; मात्र या नियमावलींचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.

ड्रोन उडविण्यासाठी परवाना हवा!

१. ड्रोन उडवायचे झाल्यास त्यासाठी लायसन्स हवे असते. ज्या भागात ड्रोन उडवायचे आहे, त्या भागातील पोलीस ठाण्यात यासाठी अर्ज द्यावा लागतो.

ड्रोनचे लायसन्स हे दिल्ली येथील डीजीसीए या संस्थेकडून दिले जाते. त्यासाठी अर्ज करून हे लायसन्स मिळवावे लागते.

उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप नियमाचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. सर्रास विनापरवाना ड्रोनचा वापर केला जात आहे.

प्रशिक्षण घेऊनच ड्रोन उडवा-

ड्रोन उडविण्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रशिक्षण घेतलेले असल्यास यात सर्वांचीच सुरक्षितता राहू शकते. लग्नासाठी दिवसाला १० हजार रुपये भाडे देऊन उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आदी ठिकाणाहून ड्रोन भाड्याने घेतले जातात.

- मनीष सोनी, उपाध्यक्ष, फोटोग्राफर असोसिएशन, उमरगा

ड्रोन वापरण्याचेही नियम-

ड्रोन उडवायचे असल्यास त्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही भागात ड्रोन उडवायचे असल्यास यासाठी पोलिसांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

१०० फुटापेक्षा अधिक उंचीवरून ड्रोन उडविता येत नाही

ज्या भागात शूटिंग करायची आहे, त्या भागातील पोलीस ठाण्यात अर्ज द्यावा लागतो.

विमानतळ, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालय परिसरात ड्रोन उडविता येत नाही.

विनापरवानगी ड्रोन उडविल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे एकतर परवाना अथवा प्रमाणपत्र आ‌वश्यक आहे.

दिवसाला दहा हजार रुपये भाडे

लग्न समारंभात ड्रोनद्वारे शूटिंग करायची झाल्यास ती ‘प्री वेडिंगच’ अधिक असते. त्यामुळे या दिवसासाठी अधिक खर्च केला जातो. एक दिवसाला दहा हजार भाडे द्यावे लागते. उस्मानाबाद, लातूर सोलापूर येथून यासाठी ड्रोन मागवले जातात.

ड्रोनद्वारे शूटिंग करण्यास पसंती वाढत असल्याने त्यांचे भावही काहीसे वधारत आहेत.

लग्न समारंभात एका दिवसाच्या शूटिंगसाठी दहा हजार रुपयापेक्षा जास्त खर्च येतो. यात शहराबाहेर जायचे असल्यास अधिक खर्च येतो.