मुरूम : उमरगा तालुक्यातील मुरूम शहरात कोरोनो बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवारी नगरपरिषद आणि मुरूम पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात फेरी काढून नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.
यावेळी मास्क वापरा, सोशल डिस्टन्स बाळगा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा व प्रशासनाच्या आवाहनाला सहकार्य करा, असे आवाहन ध्वनीक्षेपाकाद्वारे करण्यात आले. यावेळी
मुरूमचे सपोनि. यशवंत बारवकर, सपोनि. रंगनाथ जगताप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत केरूळकर, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे, शहर अभियंता विक्रम देवकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील बसस्थानक ते बसवेश्वर चौक ,भीमनगर,अशोक चौक,किसान चौक, हनुमान चौक या मार्गावर फेरी काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी नगरपालिकेतील सर्व कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.