पुणे येथील दोन तरुण उस्मानाबाद येथे नकली सोने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास खबऱ्यामार्फत प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोना दिपक लाव्हरे पाटील, संतोष गव्हाणे, पोकॉ अशोक ढगारे यांच्या पथकाने ५ मे रोजी शहरालगतच्या महामार्गावरील साई हाॅटेल परिसरात सापळा लावला. यावेळी एमएच १२ एसएल ६३७६ या क्रमांकाची कार त्या ठिकाणी आली. कारमधून पुणे येथील दिलीप प्रतापिंग सुरडकर, जब्बार करीम शेख या दोघांनी एका ग्राहकास खरे सोने भासवून नकली सोन्याच्या ८ अंगठ्या विक्री करत असताना आढळून आले. यावरुन पोलिसांनी त्या दोघांना नकली सोने, दोन मोबाईल व कारसह ताब्यात घेतले. सरकारतर्फे दिलेल्या खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाण्यात उपरोक्त दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
नकली सोने विकण्याचा प्रयत्न, दोघांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST