शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस असल्याचे सांगून खंडणी उकळणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

कळंब : पोलिस असल्याचा बनाव करत एका व्यक्तिकडून खंडणी उकळणाऱ्या तोतयास कळंब पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पत्रकार ...

कळंब : पोलिस असल्याचा बनाव करत एका व्यक्तिकडून खंडणी उकळणाऱ्या तोतयास कळंब पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पत्रकार असल्याचे ओळखपत्र व एक ‘एअर गन’ ही हस्तगत करण्यात आली आहे.

एखाद्या सिनेमाचे कथानक असल्यासारखी ही हकिकत घडली आहे तालुक्यातील इटकूर येथे. पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी ईटकूर येथील नारायण मुरलीधर गंभिरे यांच्याकडे एक व्यक्ती आला. तो स्वतःला पोलिस असल्याचा भासवत होता. यावेळी त्यांनी मागच्या दोन वर्षापूर्वी तुमच्यावर जुगाराचा गुन्हा दाखल झाला होता, असे सांगत ‘मी साहेब आहे, मला हप्ता द्या, नाहीतर गुन्हा दाखल करेल’, असे गंभिरे यांना धमकावत पन्नास हजार मागितले. यानंतर घाबरलेल्या गंभिरे यांनी जवळचे दहा हजार दिले. परत, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या व्यक्तीने गंभीरे यांच्याकडे येऊन मोठी रक्कम मागितली.

यावर गंभिरे व त्यांचा मुलगा खातरजमा करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचे मोबाईल हिसकावून घेत ‘मोठे साहेब टोकणीवर थांबले आहेत, तेथे या’, असे बजावले.

यानंतर गंभिरे पिता पुत्रांना त्या ‘साहेबांचा’ संशय आला. कोणत्या ऑफीसला आहात? अशी गंभिरे यांनी विचारणा केली असता एकाचवेळी एका दैनिकाचा पत्रकार असल्याचे व पोलिस अधिकारी असल्याचे कार्ड दाखवले. यावर पोलिस असल्याचा बनाव करणारा तो व्यक्ती ‘तोतया’ असल्याची खात्री पटल्यानंतर ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती कळंब पोलिसांना देत त्या ठकसेन साहेबाला पकडून ठेवले. यानंतर सपोनि अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सी. एस. गुसिंगे यांच्या पथकाने तात्काळ इटकूर गाठत पोलिस असल्याचा बनाव करत खंडणी उकळणाऱ्या त्या व्यक्तीस ताब्यात घेतले.

सदर व्यक्तीविरुद्ध नारायण गंभिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती. त्या व्यक्तिकडूुन एका दैनिकाचा वार्ताहर असल्याचे ओळखपत्र व एक एअर गन ही ताब्यात घेतली असल्याचे पोउनि सी. एस. गुसिंगे यांनी सांगितले.