शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादी विरोधी बाकावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव, जनकापूर ग्रुप ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य निवडून आलेले असतानाही एका सदस्याने ऐनवेळी दुसऱ्या ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव, जनकापूर ग्रुप ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य निवडून आलेले असतानाही एका सदस्याने ऐनवेळी दुसऱ्या गोटात जाऊन सरपंचपद मिळविले. यामुळे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या सदस्यांना आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. दरम्यान, महेश कोळी याची सरपंच पदावर तर उपसरपंचपदी पंकज चव्हाण यांची निवड झाली.

पारगाव-जनकापूर या ग्रुप ग्रामपंचायतवर आतापर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. या निवडणुकीत देखील राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत पॅनलचे सात सदस्य व एक अपक्ष असे आठ सदस्य निवडून आले होते. याशिवाय सीपीआयचा एक, शिवसेना तीन तर एक अपक्ष सदस्य विजयी झाला. येथील सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादीकडे सरपंच पदासाठी दोन उमेदवार पात्र असून, ते दोघेही इच्छुक होते. त्यामुळे सरपंच कोणाला करायचे, असा प्रश्न स्थानिक पुढाऱ्यांसमोर होता. यात शेवटपर्यंत एकमत झाले नाही. अखेर महेश कोळी यांनी ऐनवेळी दुसऱ्या गोटात उडी घेतली. यावेळी सरपंच पदासाठी महेश कोळी व सोनाली निंगुळे यांनी तर उपसरपंच पदासाठी पंकज चव्हाण व धनंजय मोटे यांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी हात वर करून मतदान करण्यात आले. यामध्ये महेश कोळी व पंकज चव्हाण यांना प्रत्येकी सात मते मिळाल्याने ते विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. एस. माचवे यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी सहाय्य केले.