नळदुर्ग : एसबीआय फाऊंडेशनच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनसह तीनशे रुग्णांना पुरेल एवढी औषधी भेट देण्यात आली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे व जिल्हा आरोग्य अधिकारी वसंतराव वडगावे यांच्या हस्ते या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. प्रारंभी कृषिदिनानिमित्त दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन, यानंतर कोविड सेंटरच्या परिसरात वृक्षारोपण, तसेच डॉक्टर दिनानिमित्त सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, पं. स. रेणुका इंगोले, सहायक गटविकास अधिकारी मोहन राऊत, एसबीआयचे शाखाधिकारी निर्माण पारकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, डॉ. माधव सादगिरे, नळदुर्गचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव, दिलासाचे विलास राठोड, प्रणव उन्हाळे, रंजना राठोड, भूषण पवार, हरिष जाधव, आरोग्य विभागाच्या डॉ. अंकाक्षा गोरे, डॉ. नारायण घुगे, डॉ. स्मिता कुंटे, व्यकंटेश घुगे, परिचारिका बालिका कोकाटे, कविता राठोड, रेखा गायकवाड, मनीषा सरवदे, अनिल राठोड, शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते.
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनसह औषधींचीही भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST