शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

६० खाटाच्या महिला रुग्णालयात १५० रुग्णांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:37 IST

जिल्ह्याभरातील महिला रुग्णांची सोय व्हावी, त्यांची हेळसांड थांबावी म्हणून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्री रुग्णालय सुरू करण्यात आले. परंतु, या ...

जिल्ह्याभरातील महिला रुग्णांची सोय व्हावी, त्यांची हेळसांड थांबावी म्हणून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्री रुग्णालय सुरू करण्यात आले. परंतु, या रुग्णालयातील असुविधांची श्रृंखला काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. रुग्णालयाच्या इमारतीच्या तळ मजल्यावर प्रसूतीपूर्व महिलांना उपचार देण्यात येत आहेत, तर प्रसूतीपश्चात महिलांची सोय दुसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. यारुग्णालयातील बेडची संख्या ६० इतकी आहे. मात्र, रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या १०० ते १५०च्यावर आहे. त्यामुळे उपलब्ध बेड अपुरे पडत असून, महिलांना जमिनीवर अंथरूण टाकून उपचार घ्यावे लागत असतात. खाटाच्या संख्या कमी असतानाच मनुष्यबळही कमी पडत आहे. क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण भरती असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

पूर्ण सुविधा आहेत का?

स्री रुग्णालयात प्रतिदिन महिला रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांसाठी खाटांची पुरेशी संख्या नसल्याने महिला रुग्णांची गैरसोय होती. पिण्याच्या पाण्याचे टाकी सतत कोरडी असल्याने रुग्णांना बाहेरूनच जार किंवा पाण्याची बाटली घ्यावी लागते. शिवाय, रुग्णांच्या तुलनेत परिचारिकांची संख्याही अपुरी पडत आहे. मात्र, पर्याप्त मनुष्यबळाच्या संख्येवरच रुग्णसेवा देण्याचे काम डॉक्टर व परिचारिकांकडून केले जात आहे.

प्रतिक्रिया...

डॉक्टरांचा राउण्ड वेळेवर होत असतो. तपासणी करून औषधी लिहून दिली जाते. परिचारिकाही उपस्थित असतात. बाळाला डोसही वेळेवर देण्यात आले. येथे काही महिला रुग्णांना खाटा मिळत नाही. पुरेशी खाटांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

प्रीती आवटाळे, रुग्ण

नातेवाईक महिलेला दोन दिवसांपासून प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर वेळेवर तपासणी करीत आहेत. मात्र, रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे बाहेरून पाणी आणावे लागते.

अनिल जाधव, रुग्णाचे नातेवाईक

डॉक्टरांचा वेळेवर राउण्ड होताे का?

महिला रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णांची तपासणी केली जात असते. शिवाय, सकाळी ९ ते १० या वेळेत डॉक्टरांचा राउण्ड होत असतात.

प्रसूती विभाग नियमितपणे सुरू असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या २४ तास ड्यूटी लावण्यात आल्या आहेत.

परिचारिका यादेखील त्यांच्या नेमून दिलेल्या वेळी हजर असतात. तसेच डॉक्टरांनी सांगितलेले काम व तपासणी वेळेवर करतात.