शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकांनी स्वीकारली नगरपंचायतीची सूत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या ३० मार्चच्या आदेशानुसार लोहारा ...

लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या ३० मार्चच्या आदेशानुसार लोहारा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादी कार्यक्रम २०२१-२२ घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीवर १९ ते २९ एप्रिलपर्यंत हरकती व सूचनाही शहरातील जनतेकडून मागविण्यात आल्या. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभर वाढत आहेत. त्यामुळे निवडूक आयोगाने सर्वच निवडणुका रद्द केल्या. त्यात लोहारा नगरपंचायतची निवडणूकही रद्द झाली. परिणामी विद्यमान नगराध्यक्षा ज्योती मुळे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके यांच्यासह सर्वच नगरसेवकांचा कार्यकाळ ६ मे रोजी गुरुवारी संपला. त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लोहारा नगरपंचायतीच्या प्रशासकपदी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उमदले यांची नियुक्ती केली. ७ मे रोजी पदभार स्वीकारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपविभागिय अधिकारी विठ्ठल उमदले यांनी नगराध्यक्षा ज्योती मुळे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यधिकारी गजानन शिंदे, कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोडगे, नगरसेवक आदींची उपस्थिती हाेती.