शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

२०९५० निराधारांना मिळणार ‘आधार’; प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST

तालुक्यात संजय गांधी निराधारचे २ हजार ९१० लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे १ हजार २१७० व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतनाचे ...

तालुक्यात संजय गांधी निराधारचे २ हजार ९१० लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे १ हजार २१७० व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतनाचे ५ हजार ८७० असे एकूण २० हजार ९५० लाभार्थी आहेत. मागील लॉकडाऊन काळात या निराधारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी अनेक सामाजिक संस्था, संघटना तसेच दानशूर व्यक्तींनी देखील मदतीचे हात पुढे केल्याने या निराधारांची अडचण थोडी कमी झाली होती. दरम्यान, या लॉकडाऊन काळात सरकारने प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया @

राज्य सरकारने कोरोना काळात एक हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही चांगली बाब आहे. यामुळे कोरोना काळात निराधारांना अधार मिळणार आहे.

- नागरबाई राजेंद्र मेहर, लाभार्थी, भूम

मागील संपूर्ण वर्ष कोरोनामध्ये गेले. यंदाही तीच परिस्थिती दिसत आहे. कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशावेळी राज्य सरकारने निराधारांना एक हजार रुपयांची मदत जाहीर केल्याने नक्कीच आधार मिळाला आहे. लॉकडाऊन काळात आर्थिक ओढाताण होणार आहे.

- यमुना माधव गुरसाळी, लाभार्थी, भूम

निराधारांना सरकारने एक हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केल्याने कोरोना महामारीच्या काळात काही प्रमाणात दैनंदिन खर्चास याचा उपयोग होणार आहे. ही मदत तुटपुंजी असली तरी लॉकडाऊन काळात आर्थिक हातभार लागला आहे.

- शेख मुनेर शेखलाल, लाभार्थी भूम

कोरोना महामारीत निराधारांना सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत लॉकडाऊन काळात गरजेची होती. यामुळे निराधारांना नक्कीच आधार मिळाला आहे. यातून किमान निराधारांचा औषधोपचारासाठीचा खर्च तरी भागणार आहे.

- सिंकदर गफूर पठाण, लाभार्थी, भूम

निराधाराचे जे मानधन मिळते, त्यावरच सध्या माझी उपजीविका चालते. कोरोनाचा लॉकडाऊन पुन्हा सुरू झाला आहे. ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे. आशा परिस्थितीत सरकारने निराधारांना आर्थिक मदत जाहीर करून मोठा आधार दिला आहे.

- रुक्मिणीबाई भाऊसाहेब बोराडे, लाभार्थी, सावरगाव