उस्मानाबाद : आपले संपूर्ण जीवन पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी घालविणाऱ्या १०१ कार्यकर्त्यांचा रिपाइंच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास राजाभाऊ ओहाळ, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रासप जिल्हाध्यक्ष आश्रुबा कोळेकर, प्रदेश सचिव संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास आनंद पंडागळे, रवीराज पाटील, भागवत शिंदे, बंडू बनसोडे, तानाजी कदम, अमोल शिंदे, विद्यानंद बनसोडे, तानाजी गंगावणे, सविन शिंगाडे, संपत जानराव, उदयराज बनसोडे, स्वरान जानराव, मुकेश मोटे, फकिरा सुरवसे, बाबासाहेब मस्के, मुन्ना ओहाळ, बाबा बनसोडे, एस. के. गायकवाड, रवी कांबळे, बालाजी माळाळे, गौतम कांबळे, महेंद्र जेटीथोर, तुकाराम वाघमारे, दिलीप गायकवाड, जयसिंग भालेराव, वंदू भालेराव, आकाश इंगळे यांच्यासह मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, संग्राम बनसोडे, भीमशक्ती संघटनेचे मेसा जानराव आदी उपस्थित होते. आभार रिपाइंचे जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड यांनी मानले.