उस्मानाबाद : आपत्कालीन स्थितीत देशातील दाेन कंपन्यांनी तयार केलेली लस देण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार सरकारकडून लसीकरणाची आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे; परंतु अधूनमधून साइडइफेक्टच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील कर्मचारी पहिल्या टप्प्यात लस घेण्यास राजी नाहीत; परंतु उस्मानाबादेतील १०० टक्के लस घेण्यासाठी नाेंदणी केली आहे.
काेराेना विषाणूने संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजविला. त्यामुळे लस कधी येते? याकडे जगभराचे लक्ष लागले हाेते. असे असतानाच देशातील दाेन कंपन्यांची लस आपत्कालीन स्थितीत देण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे सरकारकडूनही लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी तसेच काेराेना वाॅरिअर्सना लस देण्याचे नियाेजन आहे. सरकारच्या निर्देशानुसार आराेग्य यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांची नाेंदणी करण्यात आली आहे. दरम्यान, अधूनमधून काेराेना लसीच्या साइडइफेक्टच्या अनुषंगाने बातम्या येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी काही जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांकडून भीतीपाेटी पहिल्या टप्प्यात लस घेण्यासाठी नकार दिला जात आहे. असे असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र तसे चित्र नाही. खाजगी तसेच सरकारी मिळून जिल्ह्यातील डाॅक्टर, आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ८ हजार २७२ एवढी आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी नाेंदणी केली आहे. सदरील यादी सरकारला सादर करण्यात आली आहे. यामध्ये डाॅक्टरांची संख्या ६३७ एवढी असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.
चाैकट...
काेराेना लस घेण्याच्या अनुषंगाने शासनाकडून डाॅक्टर, आराेग्य कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली हाेती. त्यानुसार आपण कर्मचाऱ्यांची नाेंदणी करून घेतली आहे. आपल्याकडील सर्वच्या सर्व ८ हजार २७२ कर्मचाऱ्यांनी लस घेण्याची तयारी दर्शविली आहे. एकाही कर्मचाऱ्याने नकार दिलेला नाही. त्यामुळे लस उपलब्ध हाेताच सर्वांना लस देण्याचे नियाेजन आहे.
-डाॅ. हनुमंत वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी.
डाॅक्टर, कर्मचाऱ्यांची काय आहे भावना?
काेराेना लसीच्या साइडइफेक्टच्या अनुषंगाने अधूनमधून बातम्या येत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात घ्यावी की, दुसऱ्या टप्प्यात, याअनुषंगाने थाेडीबहुत चलबिचल हाेते; परंतु अनेक महिने संशाेधन करून लस तयार करण्यात आली आहे. त्यामुळे लस घेण्याची तयारी दर्शविली असून तशी नाेंदणी केली आहे.
०००
कर्मचारी, अधिकाऱ्यांनी नाेंदणी केली नाही.
६३७
जिल्ह्यात डाॅक्टर
७६३७
आराेग्य कर्चाऱ्यांनी केली लसीसाठी नाेंदणी