शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या रागातून दोघांची हत्या; विधवा सुनेसह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं

By कुणाल गवाणकर | Updated: October 30, 2020 13:32 IST

सासरे आणि दिराला पोलिसांकडून अटक; हत्येचा गुन्हा दाखल

जालना: अनैतिक संबंधातून एका महिलेसह तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जालन्यातील चपळगावात घडली आहे. या प्रकरणी महिलेचे सासरे आणि दिराला अटक करण्यात आली आहे. विधवा सुनेचे प्रेमसंबंध असल्याच्या रागातून हा प्रकार घडला. ट्रॅक्टरखाली चिरडून दोघांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मारिया लालझरे आणि हरबक भागवत अशी मृतांची नावं आहेत.दोघांची हत्या करणाऱ्या बथवेल लालझरे आणि विकास लालझरे यांना चपळगाव पोलिसांनी अटक केली आहे. बथवेल लालझरे हे मारियाचे सासरे असून विकास हा तिचा दिर आहे. मारियाच्या (वय ३२ वर्षे) पतीचं १० वर्षांपूर्वी निधन झालं. त्यानंतर ती तिच्या सासू सासऱ्यांसोबत राहत असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी दिली. मारियाचे गावातल्याच हरबक भागवतसोबत (वय २७ वर्षे) प्रेमसंबंध होते. भागवत विवाहित होता.मारिया आणि हरबकच्या प्रेम संबंधाला तिच्या सासरच्या मंडळींचा विरोध होता. मारियापासून दूर राहा, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी त्यांनी हरबकला दिली होती. त्यानंतर हरबकनं अंबड पोलीस ठाण्यात मारियाचे सासरे आणि दिराविरोधात तक्रार दाखल केली. आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं तक्रारीत म्हटलं होतं. ३० मार्चला हरबक आणि मारिया गुजरातला पळून गेले. त्यानंतर मारियाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. २२ एप्रिलला पोलिसांनी दोघांना गुजरातमधून परत आणलं. त्यानंतर ते गावात एकत्र राहू लागले. २८ ऑक्टोबरला मारिया आणि हरबक दुचाकीवरून शेजारच्या गावाला जात होते. त्यावेळी ट्रॅक्टरने येत असलेल्या विकास लालझरेने त्यांना धडक दिल्याचा आरोप आहे. विकासने त्यांना ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेत असतानाच दोघांचा मृत्यू झाला.विकास लालझरे आणि त्याच्या वडिलांनीच माझ्या पतीचा आणि मारियाचा खून केल्याचा आरोप हरबकच्या पत्नीनं केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.