शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आमदार रईस शेखसह सहा जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:42 IST

तोंडावर मास्क न लावता व सोशल डिस्टन्सिंग न पाळता बेकायदा जमाव जमवला होता. आणि शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांची बदली करण्याची धमकी देत, त्यांच्याशी व इतर पोलीस अंमलदार यांच्याशी आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिला अधिकाऱ्याबाबत केलेले चुकीचे वक्तव्य तसेच लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शेखसह ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडे चौकशी करून, नोटीस देत सोडण्यात आले आहे. नागपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. २६ तारखेला रात्री १२ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत नागपाडा जंक्शन परिसरात आझमी यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे का दिली नाही म्हणून आझमी यांनी आंदोलन छेडले. तोंडावर मास्क न लावता व सोशल डिस्टन्सिंग न पाळता बेकायदा जमाव जमवला होता. आणि शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांची बदली करण्याची धमकी देत, त्यांच्याशी व इतर पोलीस अंमलदार यांच्याशी आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला म्हणून  फिर्यादी पोलीस हवालदार रवींद्र नारायण निवासे (५१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउनदरम्यान लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन, कोरोनाचे प्रादुर्भाव वाढेल असे कृत्य,  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, सह कलम २, ३, ४ साथीचे रोगप्रतिबंधक कायद्यांतर्गत अबू आझमी, आमदार रईस शेखसह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्याविरोधात निदर्शने केली व पोलीस अंमलदाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप.