शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

ड्रग्स कनेक्शन प्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला अटक, एनसीबीने केली मोठी कारवाई

By बाळकृष्ण परब | Updated: January 13, 2021 21:33 IST

Sameer Khan arrested News : ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आज मोठी कारवाई केली आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आज मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एनसीबीने आज राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली आहे. एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली आहे. 

ड्रग्स रॅकेट प्रकरणीएनसीबीने आज राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना  चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबीकडून समीर खान यांची सुमारे दहा तासांपासून चौकशी सुरू होती. दरम्यान, सुमारे दहा तास चाललेल्या चौकशीनंतर समीर खान यांना अटक करण्यात आली, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली. 

ड्रग्स पेडलर करण सजनानी याच्या चौकशीमधून समीर खान यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर एनसीबीने समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास समीर खान हे एनसीबीच्या कार्यालयात जाताना दिसले होते.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्स प्रकरणातील एक आरोपी आणि समीर खान यांच्यात ऑनलाइन ट्रान्झॅक्शन झाल्याचे दिसून आल्यानंतर एनसीबीने त्यांच्या दिशेने मोर्चा वळवला होता. दरम्यान, या प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि अन्य दोघांना गेल्या आठवड्यात २०० किलो ड्र्ग्ससह अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Drugsअमली पदार्थnawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो