मुंबई : अमेरिकेत ३३ हजार जणांचा बळी घेणाºया घातक अशा ‘फेन्टानील’चे उत्पादन करणारा गुजरातमधील उद्योजक दीपक नटवरलाल मेहता (५९) याला गुरुवारी अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) बेड्या ठोकल्या. एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत ११६ किलो फेन्टानील जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी एअर कार्गो मार्गे इटलीला ४०० किलो फेन्टालीन गेल्याने सीमा शुल्क विभागाचे अधिकारीही चौकशीच्या घेºयात अडकले आहेत. देशातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
मेहता याच्या राजकोटमधील ६ ते ७ एकरमध्ये असलेल्या कारखान्यात हे अमलीपदार्थ बनविण्यात आले. यात इटलीतील एका नामांकित कंपनीचा वापर करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. याच कंपनीच्या नावाचा वापर करून इटलीतील तस्कर हा साठा ठिकठिकाणी पोहोचवत असल्याचेही समजते. या कंपनीबाबत अधिक चौकशी सुरू आहे. मेहता हा गुजरातमधील नामांकित उद्योजकांपैकी एक आहे. सुमारे ३०० ते ४०० कोटींच्या संपत्तीचा तो मालक आहे. त्यानुसार, एएनसीचे पथक अधिक तपास करीत आहे.
व्हाया मॅक्सीको ते अमेरिका...फेन्टानीलचे कच्चे मिश्रण तस्कर मॅक्सीकोतून अमेरिकेत पोहोचवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.सीमा शुल्क अधिकारी रडारवर...च्धक्कादायक बाब म्हणजे ४०० किलो फेन्टानील एअर कार्गोमार्गे इटलीला रवाना झाले आहे. फेन्टानील किंवा त्याचे कच्चे मिश्रण निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे.च्तसे आदेश केंद्र्र सरकारने काढले आहेत. मात्र यात कुठल्याही स्वरूपाची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याने, अधिकारीही संशयाच्या घेºयात सापडले आहेत. त्यांनी याबाबत चौकशी का केली नाही? परवानगी नसताना एवढा मोठा साठा कसा जाऊ दिला? याबाबत एएनसीकडून अधिक तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात सीमा शुल्क अधिकाºयांवर अटकेची कारवाई होऊ शकते.