मुंबई : चोर असल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी वाडीबंदर परिसरात घडली. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्ह्याची उकल करून, पालिकेच्या दोन कंत्राटी सुरक्षारक्षकांना अटक केली. मंगेश कोडर (३५) आणि सूरज बोलके (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव माजिद साजिद अली (२३) असे असून ताे वडाळा येथील विजयनगर परिसरात वास्तव्यास हाेता. रविवारी पहाटे साडेचार ते साडेसातच्या सुमारास माजिद येथील कार्यालयाबाहेर संशयास्पदरीत्या फिरत असल्याने सुरक्षारक्षक बोलके आणि कोडर यांनी त्याला हटकले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दाेघांनी माजिदला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घांनी विरारचे घर गाठले. मात्र, पाेलिसांनी तपासाअंती सर्व प्रकरणाचा उलगडा करून आराेपींना अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
चोर असल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 04:28 IST