शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील युपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रशिक्षण

By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST

राज्यातील युपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रशिक्षण

राज्यातील युपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रशिक्षण
मुलाखतीच्या दहा सत्रांचे आयोजन
मुंबई :
युपीएससी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने दिल्लीत क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय दिल्लीच्या जुन्या महाराष्ट्र सदनात करण्यात आली असून येथे १ मे ते १ जून या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अभिरुप मुलाखतीच्या १0 सत्रांचे आयोजन केले आहे.
युपीएससीमार्फत विविध पदांसाठी ऑगस्ट २०१४ मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर २०१४ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. १३ एप्रिल रोजी मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला. या परीक्षेत ३ हजार ३०० विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या अंतिम टप्प्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील सुमारे २00 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुलाखतीचा हा टप्पा २७ एप्रिलपासून सुरु होत आहे. त्यानुसार नवी दिल्ली येथील जुन्या महाराष्ट्र सदनात विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे १ मे ते १ जून या कालावधीत महाराष्ट्र सदनामध्ये अभिरुप मुलाखतीच्या १० सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखतींचे सत्र प्रत्येक शनिवार आणि रविवार असणार आहे. यामध्ये तज्ञ्ज मार्गदर्शक, आजी-माजी सनदी अधिकारी, युपीएससीचे माजी सदस्य, वरिष्ठ पत्रकार सहभाग घेतील. अभिरुप मुलाखतींचे व्हिडियो रेकॉर्डिंग केले जाणार आहे. जुन्या महाराष्ट्र सदनात एकूण सात दिवस विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये अभिरुप मुलाखत, युपीएससीच्या मुलाखत दिवसाच्या तीन दिवसापूर्वी व शारीरिक चाचणीसाठी तीन दिवस असे एकूण सात दिवस विद्यार्थ्याला येथे वास्तव्य करता येईल.
या क्षमता विकास कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून अमरावती येथील शासकीय भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी तसेच निवासासाठी विद्यार्थ्यांना ०११-२३३८४२८९ व ०११-२३३८०३२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.