शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढीचा नवा शॉक

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

अधिसूचना जारी :

अधिसूचना जारी :
पणजी : एका बाजूने पाणीप˜ीत वाढ आणि दुसर्‍या बाजूने वीज दरवाढ, असे शॉक देणे सरकारने सुरूच ठेवले आहे. सोमवारी राजपत्रात सरकारने अधिसूचना प्रसिद्ध करून घरगुती व व्यावसायिक वापरासाठी नवी वीज दरवाढ जाहीर केली आहे.
यापूर्वी साधारणत: १२ टक्के वीज दरवाढ झालेली आहे. त्याविषयीची अधिसूचना अजून जारी झालेली नाही. तथापि, त्या दरवाढीव्यतिरिक्त आता नव्या दरवाढीबाबतची अधिसूचना जारी झाली आहे. संयुक्त वीज नियमन आयोगाच्या निर्णयानुसार मुख्य वीज अभियंता एस. लक्ष्मणन यांच्या सहीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वापराच्या विजेचे नवे दर कसे असतील, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
कमी दाबाच्या पुरवठ्यासाठी घरगुती वापराच्या विजेवर पहिल्या ६० युनिटसाठी प्रति युनिट १४ पैसे दर आकारला जाईल. त्यापुढे २५० युनिटच्या वापरासाठी प्रति युनिट २१ पैसे व ५०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी प्रति युनिट ३३ पैसे दर आकारला जाणार आहे. ५०० युनिटपेक्षा जास्त विजेच्या वापरासाठी प्रति युनिट ३९ पैसे दर आकारला जाणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
व्यावसायिक वापरासाठीच्या विजेकरिता १०० युनिटपर्यंत प्रति युनिट ३७ पैसे आकारले जाणार आहेत. १ हजार युनिटपर्यंतच्या वापरावर ४७ पैसे व त्यापेक्षा जास्त विजेच्या वापरावर प्रति युनिट ५४ पैसे आकारले जाणार आहेत.
हॉटेल व्यवसायासाठी असलेल्या विजेवर प्रति युनिट ४८ पैसे, सार्वजनिक रोषणाईसाठी ४३ पैसे, तर उच्च दाबाच्या वाहिनीद्वारे उद्योगांसाठी वापरल्या जाणार्‍या विजेकरिता प्रति युनिट ५२ पैसे असा दर आकारला जाणार आहे. (खास प्रतिनिधी)

वीज खांबांच्या वापराविरुद्ध एफआयआर
वीज खांबांचा फुकटात खासगी कामांसाठी वापर करण्याची पद्धत बंद करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात घेतलेला निर्णय सोमवारी अधिसूचित करण्यात आला. शुल्क न भरता वीज खांबांवर कुणीही केबल टाकणे व जाहिरात फलक लावणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शुल्क सरकारने निश्चित केले असून ते अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करून जर सरकारी वीज खांबांचा वापर केला, तर त्याबाबत संबंधित क्षेत्रातील पोलीस स्थानकात एफआयआर नोंद केला जाईल, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.