शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकाप्रती सहकार्याची भावना ठेवा- श्री गौरवकृष्णजी

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

नांदेड - जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहीजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल़ परंतु सद्यस्थितीत सहकार्यापेक्षा एकमेकांना मागे ओढण्याची खेकडवृत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून ही वृत्ती निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन श्री गौरवकृष्णजी यांनी केले़

नांदेड - जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहीजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल़ परंतु सद्यस्थितीत सहकार्यापेक्षा एकमेकांना मागे ओढण्याची खेकडवृत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून ही वृत्ती निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन श्री गौरवकृष्णजी यांनी केले़
कौठा परिसरात श्री सालासर भजन मंडळ सेवा समितीच्यावतीने आयोजित श्रीरामकथेच्या सहाव्या दिवशीच्या सत्संगात व्यास हे भाविकांना उपदेश करीत होते़ प्रारंभी वेदघोष, मंत्रोच्चार करण्यात आले़ त्यानंतर गुरूवर्यांचे पुजन करण्यात आले़
शुक्रवारच्या सत्संगात त्यांनी कुटूंबातील आपला सहभाग, भोग आणि त्याग यासंबंधी श्रीराम चरित्राच्या आधारे स्पष्ट केला़ ते म्हणाले, सध्या सर्वचजण पैसा आणि व्यवसायाच्या मागे लागला आहे़ कुणालाही गरजेपुरत्या पैशापेक्षा अधिक पैसा हवा असून जो-तो आपल्या पिढीसोबत पुढील पिढीचा नको तितका विचार करतो आहे, आपल्या पुढच्या पिढीला देखील अर्थाजनासाठी हात-पाय, बुद्धी असल्याचा जसा काय विसरच पडला आहे़ व्यवसाय आणि अर्थार्जन करताना व्यक्तीमध्ये एकमेकांबाबत घृणा निर्माण झाली आहे़ एकमेकांना मागे ओढण्याची जशी काय स्पर्धाच लागली आहे़ ते समाजाच्या विकासासाठी घातक असल्याचेही त्यांनी सांगितले़
आपल्या कौटुंबिक जीवनात कुण्याही महिलेला अथवा पुरूषाला कुटूंबाची जबाबदारी मुलांवर सोपविण्याची इच्छा दिसत नाही़ खरे तर आपले अपत्य कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यास सक्षम झाल्यास वयाच्या पन्नाशीनंतर आपण स्वत:हून आपल्या कमरेच्या चाव्या त्यांच्या हाती दिल्या पाहीजे़ परंतू असे होतांना दिसत नाही़ श्रीरामांना राजा दशरथाने योग्यवेळी राज्यभिषेक करून समस्त आयोध्येच्या कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती़ ही सत्यता नाकारून चालणार नाही, असेही व्यास यांनी सांगितले़
सचसे मुह मोडने से क्या होगा,
ये जहा छोडने से क्या होगा
अपने मुंह की धूल साफ करो,
आयना तोडणे से क्या होगा़़़ यावेळी त्यांनी जीवनातील मोक्षाबाबतही भाष्य केले़ ते म्हणाले, जीवनातील भगवंत प्राप्तीची इच्छा पुर्ण न होताच शरीर सोडल्यास तो आपला मृत्यू असतो तर इच्छापुर्तीनंतर शरीर सोडल्यास तो मोक्ष असतो़ त्यासाठी आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहीजे़