शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

उमवित क्षयरोग जागृती सप्ताहाचे उद्घाटन

By admin | Updated: March 22, 2016 00:39 IST

जळगाव :जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आरोग्य केंद्रात क्षयरोग जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

जळगाव :जागतिक क्षयरोग दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आरोग्य केंद्रात क्षयरोग जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन. प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्रा. अर्चना देगावकर, प्रा. सत्यजित साळवे, डॉ. शांताराम नारखेडे, डॉ. सोनाली जवंजाळ, डॉ. शीतल पाटील, डॉ.नीलिमा पाटील, चंद्रकांत इसे, मंगला लोणे, बाळासाहेब पाटील, बलभिम गिरी, विवेक सोनवणे उपस्थित होते.
सप्ताहांतर्गत उमविने दत्तक घेतलेल्या पाच गावांमध्ये क्षयरोग जनजागृती व जलजागृती अभियान होणार आहे. सावदा (ता एरंडोल) येथे सायंकाळी डॉ.नीलिमा पाटील यांचे व्याख्यान व समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य झाले.
२२ रोजी सकाळी ११ वाजता कुलसचिव प्रा. महाजन यांच्या उपस्थितीत रामनगर ता.धुळे येथे जनजागृती कार्यक्रम व पथनाट्य सादर होणार आहे. काठी ता. धडगाव येथे मोठ्या प्रमाणात होळीचे आयोजन होते. यामुळे २३ रोजी क्षयरोग निर्मूलन जनजागृती केली जाणार आहे. २६ रोजी उसमळी ता. यावल येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताह उद्घाटन कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.शीतल पाटील यांनी मानले.

इन्फो-
केंद्र सरकारने क्षयरोगमुक्त भारत मोहीम हाती घेतली असून उमविने या मोहिमेंतर्गत चॅलेंज टीबी- युनियन सोबत करार केला आहे. त्याचा भाग म्हणून क्षयरोग निर्मूलन जनजागृती सप्ताहाचे आयोजन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.