शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

हुश्श... दहावीची परीक्षा संपली

By admin | Updated: March 20, 2015 22:39 IST

पुणे : शाळेचा उंबरठा ओलांडून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करण्यासाठी महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीची मराठी माध्यमाची परीक्षा शुक्रवारी संपली. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह पालकांनीही सुस्कारा सोडला. आता त्यांना निकालाची हुरहूर लागून राहणार आहे.

पुणे : शाळेचा उंबरठा ओलांडून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करण्यासाठी महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीची मराठी माध्यमाची परीक्षा शुक्रवारी संपली. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह पालकांनीही सुस्कारा सोडला. आता त्यांना निकालाची हुरहूर लागून राहणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा दि. ३ मार्च पासून प्रथम भाषा असलेल्या मराठी विषयाने झाली. बहुतेक मराठी माध्यम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा या दिवसापासून सुरू झाली होती. शुक्रवारी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा झाली. या विद्यार्थ्यांचा हा अखेरचा पेपर होता. बहुतेक विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा या पेपर दिल्यानंतर संपली आहे. परीक्षा संपल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ताण कमी झाला आहे. तसेच पालकांचा भारही कमी होणार आहे. साधारणपणे जून महिन्यात दहावीचा निकाल लागतो. तोपर्यंत या विद्यार्थ्यांना निकालाची हुरहूर लागून राहणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांची मराठीसह अन्य भाषा द्वितीय व तृतीय भाषा विषय आहेत, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दि. २६ मार्चपर्यंत चालणार आहे. सोमवारपासून द्वितीय व तृतीय मराठी व इतर विषयांची परीक्षा होणार आहे. त्यानंतर हे दहावीचे विद्यार्थी परीक्षेतून मोकळे होणार आहेत.
----------