शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’च्या माध्यमिक शाळा ‘सलाईनवर’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:04 IST

उस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : लोकप्रतिनिधींसह शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना अखेरची घरघर लागली आहे. सुमारे ६० टक्के शाळांमध्ये दोनशेपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे. विशेष म्हणजे, पटसंख्या वाढावी या उद्देशाने १४ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण सुरू करण्यात आले. परंतु, सदरील मात्राही निरर्थक ठरल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असतानाही ना लोकप्रतिनिधी, ना शिक्षण विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत आहेत.एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत ५३ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. यातील बहुतांशी शाळा या तालुक्याच्या ठिकाणी आहेत. असे असतानाही विद्यार्थी संख्येची घसरण सुरूच आहे. ही घसरण थांबविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेच आज ५३ पैकी ३५ शाळा अशा आहेत, की जेथे विद्यार्थीसंख्या दोनशेपेक्षाही कमी आहे. तर उर्वरित १८ शाळांत मात्र, दोनशेवर विद्यार्थी आहेत. उपरोक्त आकडेवारी पाहता, जवळपास ६० टक्क्यांवर शाळा सलाईनवर असल्याचे समोर येते. या शाळांची अवस्था सुधारण्यासाठी फारशे प्रयत्न होत नसल्यानेच वर्षागणिक पटसंख्या घटू लागली आहे. पटसंख्येची घसरगुंडी थांबविण्यासोबतच विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने माध्यमिक शाळांतून व्यवसाय शिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमांतर्गत ५३ पैकी जवळपास १४ शाळांची निवड झाली आहे. परंतु, या उपक्रमाबाबात जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे व्यवसाय शिक्षण सुरू करूनही पटसंख्या अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. शिक्षण विभागाचा हा सर्व गोंधळी कारभार सुरू असताना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने संबंधित अधिकाऱ्यांचेही चांगलेच फावले. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य पालकांतून व्यक्त होत आहे.पटसंख्या वाढणार कधी?जिल्हा परिषदेकडे तज्ज्ञ शिक्षक आहेत. सर्व सोयीसुविधाही आहेत. व्यवसाय शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. असे असतानाही पटसंख्या काही केल्या वाढत नाही. त्याला कारणही तसेच आहे. पटसंख्या का कमी होतेय? याचा विचार करायला कोणीही राजी नाही. कधी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांच्या बैठकाही होत नाहीत. त्यामुळे पटसंख्या वाढणार तरी कशी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.