शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्तीचा फटका जि.प.शाळेला

By admin | Updated: July 17, 2017 23:31 IST

हिंगोली : शहरातील मंगळवारा जि.प. प्राथमिक शाळा शाखा क्र.१ व २ हागणदारीमुक्तीसाठी बांधलेल्या शौचालयाच्या ड्रेनेजचे पाणी येत असल्याने जवळपास ३00 विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील मंगळवारा जि.प. प्राथमिक शाळा शाखा क्र.१ व २ हागणदारीमुक्तीसाठी बांधलेल्या शौचालयाच्या ड्रेनेजचे पाणी येत असल्याने जवळपास ३00 विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेला वारंवार कळवूनही याची दखल घेतली जात नसल्याने शाळा प्रशासनही हैराण आहे. आज मुले नगरसेवकाच्या घरावर धडकले अन् लगेच कामाला प्रारंभ झाला. हिंगोली शहरातील मंगळवारा भागात जि.प. कन्या व मुलांची शाळा आहे. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत या शाळा भरतात. एका सत्रात १६५ तर उर्वरित दुसऱ्या सत्रात आहेत. या शाळेला लागूनच हिंगोली नगरपालिकेने स्वच्छतागृह उभारले आहे. हागणदारीमुक्तीसाठी झटपट काम आटोपण्याच्या नादात या स्वच्छतागृहाचे आऊटलेटच योग्य स्थितीत काढण्यात आले नाही. शाळेच्या मागच्या बाजूला कीचन शेडनजीकच ड्रेनेज फुटले आहे. त्याचे पाणी शाळेच्या आवारापर्यंत येत आहे. त्यामुळे मुलांचे खेळण्याचे मैदान ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याने व्यापले आहे. एवढेच नव्हे, तर या मुलांना खिचडी व दुपारचे जेवण याच ठिकाणी करावे लागते. त्यामुळे काही मुलांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. आज काही मुली या भागाच्या नगरसेविका ज्योती बंडू कुटे यांच्या घरी गेल्या होत्या. त्यांनी ही बाब पालिकेला कळवून मुलांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली.याबाबत विचारले असता शाळेतील शिक्षक रामदास कावरखे म्हणाले, आम्ही याबाबत नगरपालिकेला पत्र दिलेले आहे. त्यांच्याकडून हे काम लवकरच केले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अजून दुरुस्ती झाली नाही. पालक त्यामुळे आम्हाला दोषी धरू लागले आहेत.