शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. उर्दू शाळेत टवाळखोरांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:17 IST

वाळूज महानगर : वाळूज येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत गत दोन महिन्यांपासून टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, रविवारी रात्री काहींनी शाळेतील फर्निचरची नासधूस करीत तीन ड्यूल डेस्क बेंच जाळून टाकले

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत गत दोन महिन्यांपासून टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, रविवारी रात्री काहींनी शाळेतील फर्निचरची नासधूस करीत तीन ड्यूल डेस्क बेंच जाळून टाकले. या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांत असंतोषाचे वातावरण असून, संतप्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले.रामराई रोडवर असलेल्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत ५७० विद्यार्थी आणि १७ शिक्षक आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिक्षक व विद्यार्थी शाळेत आले असता त्यांना शाळेतील तीन ड्यूल टेस्क (बेंच) जळालेल्या अवस्थेत दिसून आले. ही बाब सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांच्या लक्षात आल्यामुळे पालक व शिक्षकांनी शाळेची पाहणी केली असता त्यांना शाळेतील साहित्याची नासधूस करून बेंच जाळल्याचे दिसून आले.या प्रकाराची माहिती मिळताच सरपंच सुभाष तुपे, जिल्हा परिषद सदस्य रामदास परोडकर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, फौजदार सोनटक्के, शेख वलीभाई, सुलेमान पटेल,आलीम सरवर, माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सारखाँ पठाण,, फय्याज कुरैशी, अश्पाक पटेल, असिफ शहा, अकील शेख, अफरोज पठाण, निजाम सय्यद, अविनाश गायकवाड, संतोष दळवी आदींनी शाळेला भेट देऊन माध्यमिकचे मुख्याध्यापक भीमराव पवार, प्राथमिकचे मुख्याध्यापक संपत साबळे, शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी चर्चा केली.पालकांनी शिक्षकांना धरले धारेवरया शाळेकडे संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारीही लक्ष देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. गत चार वर्षांपासून जुनीच शालेय व्यवस्थापन समिती कार्यरत असून, नवीन समिती नेमण्यास मुख्याध्यापक उदासीन असल्याची ओरड पालकांनी केली आहे. यावेळी संतप्त पालकांनी मुख्याध्यापक भीमराव पवार, संपत साबळे व शिक्षकांना चांगलेच धारेवर धरत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. याप्रसंगी मुख्याध्यापकांनी सारवासारव करीत शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी, तसेच सुरक्षारक्षक नेमण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले. नवीन शालेय समितीची स्थापनाही लवकर करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक संपत साबळे यांनी सांगितले.