शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सभेवरून रंगले जिल्हा परिषदेचे राजकारण

By admin | Updated: August 14, 2014 01:55 IST

संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेची विशेष सभा १९ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेवरूनच सत्ताधारी आणि विरोधी मंडळींमधील राजकारण रंगू लागले असून

संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेची विशेष सभा १९ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेवरूनच सत्ताधारी आणि विरोधी मंडळींमधील राजकारण रंगू लागले असून सभा विशेष की सर्वसाधारण यावरून दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. या राजकारणात प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच करमणूक होत आहे.३१ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभा विरोधकांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे चर्चेविनाच संपली. २७ मे रोजी झालेल्या सभेतील पाणीटंचाईच्या चर्चेचे अनुपालन या सभेत का नाही, असे म्हणत तेव्हा विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पाणीटंचाईच्या मुद्यावर चर्चा व्हावी, हाच विरोधकांचा सूर होता. त्यासाठी काहींनी तर फर्निचरची मोडतोडही केली. प्रोसेडिंग बुक पळविण्याचा प्रयत्न झाला. तर सत्ताधारी मंडळींनीही ‘सर्व विषय मंजूर...मंजूर’ अशी जोरजोराने घोषणाबाजी करत सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर या मंडळींनी पत्रकार परिषदांमधून आरोप-प्रत्यारोप केले. सभेच्या विषयपत्रिकेतील आयत्या वेळच्या विषयांसह एकूण ३० विषय मंजूर झाल्याचा दावा सत्ताधारी मंडळींनी केला. तर सभेत कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही व सभा सुरू ठेवण्यासाठी आम्ही मतदानाची मागणी करून देखील ती पूर्ण झाली नाही, असे सांगत ही सभा तहकूब झाली, असा दावा विरोधी सदस्यांनी केला. सर्वसाधारण सभेचा समारोप ‘वंदे मातरम्’ गिताने होतो, मात्र हे गीत सादर न झाल्याने सभा झालीच नाही, अशी पुष्टीही विरोधकांनी जोडली. या पार्श्वभूमीवर स्वत: अध्यक्षांनी १९ आॅगस्ट रोजी विशेष सभा होणार असल्याचे सर्व पदाधिकारी, सदस्यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यासाठीची पूर्वसूचना सभेच्या १० दिवसांअगोदर सर्वांना पाठविण्यात आली आहे. मात्र या सभेत ३१ जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेतीलच सर्व विषय चर्चेसाठी ठेवण्यात आल्याने ही तहकूब झालेली सभा आहे की, विशेष सभा असा संभ्रम प्रशासनातीलच काही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.कारण सत्ताधारींच्या दाव्यानुसार सभेतील विषय जर पूर्वीच मंजूर झालेले असतील तर केवळ चर्चा करण्यासाठी विरोधक तयारी दाखवितील का, आणि विरोधकांच्या दाव्यानुसार ३१ जुलै रोजीची सभा तहकूब झाल्यानेच आता पुन्हा सभा बोलावून त्यास विशेष सभा असे नाव दिले गेले. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांच्या या दावे-प्रतिदाव्यांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची रंगीत तालिम सुरू झाल्याची चर्चाही जिल्हा परिषदेच्या आवारात होत आहे.