शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

झिंगणाऱ्यांना ना ‘हृदया’ची काळजी, ना ‘विंचवाचा’ डंख

By admin | Updated: July 29, 2014 01:09 IST

उस्मानाबाद : दारू आणि तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची शासनासह विविध सामाजिक संघटनांकडून जनजागृती करण्यात येत आहे़

उस्मानाबाद : दारू आणि तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची शासनासह विविध सामाजिक संघटनांकडून जनजागृती करण्यात येत आहे़ असे असले तरी युवक, मजुरांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून, त्यांना ना ‘ह्दया’ची काळजी ना ‘विंचवा’च्या डंखाची तमा आहे़शेतात कामाला जाणारा मजूर असो अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे युवक असोत किंवा शासकीय, निमशासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचारी असोत यात अनेकांना दारूसह तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडले आहे़ शहरातच नव्हे ग्रामीण भागाच्या गल्लीबोळात, चौकाचौकात मोठ्या प्रमाणात पानटपऱ्यांसह दारूची दुकाने थाटण्यात आली आहेत़ हातभट्टी, गावठी दारू सहजपणे उपलब्ध होत आहे़ पोलिसी कारवाईचीही सवय लागलेल्यांना याची कोणतीच तमा राहिलेली नाही़ शाळा महाविद्यालयाच्या आवारातील १०० मीटरवर पानटपरीसह इतर तंबाखू, आम्लीपदार्थ विक्री करण्यास मनाई आहे़ मात्र, तरीही या परिसरात नव्हे शाळा-महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्येच सिगारेटांचे धूर सुटू लागले आहेत़ या धुराचा सिगारेट ओढणाऱ्याला त्रास होतोच, शिवाय निर्व्यसनी युवकांनाही याचा त्रास होत असल्याचे दिसून येते़ शिवाय अनेक शिक्षकांनाही सिगारेटसह सुपारीचा छंद असल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई होणार कशी ? असा प्रश्न आहे़ तंबाखू, सिगारेटसह दारूच्या बाटल्यांवरही होणाऱ्या दुष्परिणामांच्या सूचना दिलेल्या आहेत़ तंबाखूवर विंचवाचे चित्र दाखवून तंबाखू खाणे शरीरासाठी विषाप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे़ मात्र, तरीही आम्लीपदार्थांचे सेवन राजरोस सुरू असल्याचे भीषण चित्र समाजात आहे़तंबाखूचे दुष्परिणामतंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटमुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, किडनीचा किंवा मूत्राशयाचा कॅन्सर (कर्करोग) होवू शकतो़ ५६़४ टक्के स्त्रियांना व ४४़९ टक्के पुरूषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे समोर आले आहे़ ९० टक्क्यांपेक्षा अधिक फुफ्फुसाचा आणि इतर कॅन्सर हा धुम्रपानामुळे होत असल्याचा निष्कर्ष आहे़मानसिक स्वास्थ्य बिघडतेदारूसह इतर आम्ली पदार्थामुळे संबंधितांचे मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिघडून जाते़ दारूमुळे मेंदूवरील नियंत्रण सुटल्याने गुन्हेगारी कृत्यासह समाजविघातक कृत्यही संबंधितांच्या हातून घडू शकते़ शिवाय संशयी वृत्ती, नैराश्य वाढल्याने कुटुंबातही कलह निर्माण होतात, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ महेश कानडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)वर्षभरात केला सात लाखांचा मुद्देमाल जप्त येथील अन्न व सुरक्षा विभागाचे आयुक्त पारधी, अन्न सुरक्षा अधिकारी लोंढे, एऩटी़मुजावर यांच्या पथकाने एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी गुटखा विक्रेत्यांसह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरूध्द कारवाई करून तब्बल ५ लाख, ४ हजार ५९१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ तर चालू वर्षी जुलै अखेरपर्यंत केलेल्या विविध कारवाईत एक लाख, ९३ हजार ६७१ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही अवैधरीत्या गुटखाविक्री जोमात सुरू आहे़दारूचे दुष्परिणामदारूमुळे जठरात दहा व सूज येणे, यकृतावर दुष्परिणाम झाल्याने भूक मंदावणे, अशक्तपणा येणे, कावीळ, पोटात पाणी, स्वादुपिंडाला आजार, स्नायूंचा कमकुवतपणा, मेंदी आणि ह्दयावरील वाईट परिणाम आदीमुळे दुष्परिणाम होतात़ अतिदारू प्राशनामुळे बेशुध्द झालेल्यांचा मृत्यूही होऊ शकतो़ शिवाय याचे सामाजिक परिणामही मोठे होतात़ दारू पिणाऱ्या पुरूषांसह महिलांनाही वरील अजार जडतात़सामाजिक दुष्परिणामदारू पिऊन रस्त्याने झिंगणारे ठिकठिकाणी दिसून येतात़ त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबाची सामाजिक, आर्थिक हानी मोठी होते़ शिवाय भांडण-तंटेही मोठ्या प्रमाणात उद्भवतात, समाजातही तेढ निर्माण होण्याचा धोका संभवतो़ अनेकांचे संसार दारूमुळे उध्दवस्त झाल्याची हजारो उदाहरणे समाजासमोर आहेत़सामाजिक प्रयत्न गरजेचेअवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांसह दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करते़ यापुढेही पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे़ मात्र, हा प्रश्न सहजासहजी मिटणारा नाही, त्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेला वाईट गुण काढण्यासाठी सामाजिक प्रयत्न गरजेचे आहेत़ देशाचे भविष्य असलेली युवापिढीही व्यसनाच्या आहारी जात आहे़ त्यामुळे पालकांसह त्या व्यक्तीच्या कुटुंबातील प्रत्येकाने त्याचे व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले़