शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युसूफवडगाव पोलिसांची दोन तरुणांना मारहाण

By admin | Updated: May 31, 2016 00:03 IST

युसूफवडगाव : केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे अपघातानंतर कारचालक व अन्य एकास पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी पुढे आली.

युसूफवडगाव : केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे अपघातानंतर कारचालक व अन्य एकास पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी पुढे आली. याप्रकरणी पोलिसांनी मात्र सावरासावर करीत असे काही घडलेच नाही, असा पवित्रा घेतला आहे.रविवारी सायंकाळी केज-अंबाजोगाई रस्त्यावरील बोरीसावरगावजळील तुकाराम महाराज पावनधाम मंदिरासमोर कार व दुचाकीत अपघात झाला होता. यात दुचाकी (एमएच ४४ जे ३६४१) वरील विश्वप्रताप पद्माकर वारकरी, सुनील दत्ता कोल्हे (दोघे रा. बोरीसावरगाव) हे दोघे जखमी झाले होते. घटनेनंतर युसूफवडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारचालक सचिन करपे व कारमधील किशोर करपे यांना ताब्यात घेतले. दोघांनाही घटनास्थळीच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ठाण्यात नेऊनही मारहाण करण्यात आली. त्यांचा लेखी जवाब नोंदवून कार जप्त केली.दरम्यान, अपघातानंतर सचिन व किशोर हे दोघेही घाबरलेले होते. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत ठीक; परंतु मारहाण कशासाठी ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे अद्याप गुन्हाही नोंद नाही. असे असतानाही कार जप्त कशी केली ? हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, कोणीच काही बोलण्यास तयार नाही. सर्वांनी कानावर हात ठेवले. (वार्ताहर)