नटरंग सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेल्या सोनाली कुलकर्णीने गेल्या काही वर्षांमध्ये आपला चाहतावर्ग तयार केला आहे.सोनाली सध्या झी मराठी वाहिनीवर डान्सिंग क्विन या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे.या कार्यक्रमात सोनालीने अप्सरा आली...हे गाणं जॅझ या नृत्यप्रकारात सादर केलं. या निमीत्ताने सोनालीने आपलं खास फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.मी यौवन बिजली...पाहून थिजली अशी कॅप्शन आपल्या फोटोंना दिली आहे.सोनालीच्या या हॉट अंदाजाचे फोटो व्हायरल झाले असून तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
दिलजीतने सांगितला ‘हॅपिनेस फंडा’
प्रतिकूल परिस्थितीतही अभिनेता दिलजीत दोसांजला २०२० हे वर्ष खूप सकारात्मक होतं असं वाटतंय. माझ्यासाठी हे वर्ष एक नवी उर्जा देणारं ठरलं असे मत याने एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले. तो म्हणाला, “कोरोनामुळे मला बराच काळ आयसोलेशनमध्ये राहावं लागलं. खरं तर या काळात माझ्याकडे दोन पर्याय होते एक तर दु:खी राहणं किंवा आनंदी राहाणं. मी दुसरा पर्याय स्विकारला. जी गोष्ट माझ्या नियंत्रणात नाही त्याबद्दल विचार करुन मी दु:खी का व्हायचं हा विचार मी केला अन् स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. या काळात मी अनेक पुस्तकं वाचली. कित्येक चित्रपट पाहिले. कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. वेळेअभावी अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा मी पूर्ण केल्या. त्यामुळे २०२० हे वर्ष माझ्यासाठी खूप आनंदमय आणि सकारात्मक गेलं.”