शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक फडात उतरण्यासाठी तरुणाई उत्सुक...

By admin | Updated: July 16, 2016 01:10 IST

उस्मानाबाद : नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असला तरी नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ निवडणुकीच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने केलेल्या

उस्मानाबाद : नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणार असला तरी नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ निवडणुकीच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत इच्छुकांची संख्या वाढल्याचे मत ८१ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे़ विशेष म्हणजे निवडणूकीच्या रिंगणात उतरु पाहणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या अधिक असल्याचे ६३ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे़ यंदाच्या निवडणूक आखाड्यात उतरण्याचा निर्णय अनेक युवकांनी घेतल्याने ज्येष्ठांचीही मोठी गोची होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे़प्रभागनिहाय आरक्षण सोडत झाल्यापासून आता सर्वच शहरांमधील निवडणुकांचा आखाडा पेटू लागला आहे़ आरक्षणानंतर सोयीस्कर प्रभागांची चाचपणी इच्छुकांकडून करण्यात येत आहे़ निवडणुकीच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या कशी आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता़ यात इच्छुकांची संख्या वाढल्याचे मत ८१ टक्के नागरिकांनी नोंदविले तर १९ टक्के नागरिकांच्या मते इच्छुकांची संख्या घटली आहे़ निवडणूक म्हटले की, ज्येष्ठांसह आजी-माजी पदाधिकारी, युवकांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात येते़ शिवाय अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरून अनेकजण नशिब आजमावतात़ या अनुषंगाने इच्छुकांमध्ये प्रामुख्याने कोणता वर्ग दिसतो ? हा प्रश्न विचारण्यात आला होता़ यावर इच्छुकांमध्ये युवकांची संख्या अधिक असल्याचे मत ५३ टक्के नागरिकांनी नोंदविले़ तर ज्येष्ठांची संख्या अधिक असल्याचे २५ टक्के नागरिकांचे म्हणणे असून, महिलांची अधिक संख्या असल्याचे मत २२ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे़ निवडणूक लढविणारे कोण असतील ? याचा नेम नसतो दहावी नापास असलेल्यांपासून पदवी घेतलेलेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात़ या अनुषंगाने उच्चशिक्षित युवक निवडणुकीसाठी इच्छूक दिसतात का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता़ यात ४३ टक्के नागरिकांच्या मते उच्चशिक्षित तरूण निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छूक नाहीत़ तर ३८ टक्के नागरिकांच्या मते उच्चशिक्षित युवकांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे़ तर १९ टक्के नागरिकांनी याबाबत काहीही मत नोंदविले नाही. (प्रतिनिधी)