लातूर : महाराष्ट्रामध्ये दलित आणि महिलांवरील अन्याय वाढत आहे. त्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तरुणांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र यावे, असे प्रतिपादन शहर मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष मनोज तोरडमल यांनी व्यक्त केले. यावेळी ते लातूरच्या अंबाजोगाई रोडवरील शांताई सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सुधाकर शिंदे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष पिंटू चांदणे, राजू शिंदे, नरसिंग घोडके, वसंत गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना तोरडमल म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची संख्या मोठी आहे. परंतु, संघटित नसल्यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे. परिणामी, दलित आणि महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मातंग एकता आंदोलनाच्या झेंड्याखाली तरुणांनी एकत्र येऊन अन्यायाच्या विरोधात उभे रहावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोविंद केंद्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळी शिंदे, बंटी गायकवाड, आकाश जगदे, किशोर गायकवाड, सिद्धार्थ ठाकूर, जाकीर शेख, मिलिंद सोनवणे, गोविंद केंद्रे, सोनू गायकवाड, संतोष उदारे, राहुल चव्हाण, रोहित बुधोडकर, युवराज कांबळे, शाम ठाकूर, महावीर चव्हाण, अजय शिंदे, पांडुरंग क्षीरसागर, बाळू गायकवाड, दिनेश कांबळे, अक्षय क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिक उपस्थित होते़ (वार्ताहर)
अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज
By admin | Updated: June 9, 2014 00:08 IST