शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटायझरच्या बाटलीने पेट घेतल्याने होरपळून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST

वाळूज महानगर : लाईट गेल्यानंतर सॅनिटायझरच्या बॉटलजवळ पेटती मेणबत्ती ठेवून झोपी गेलेल्या तरुण घराला लागलेल्या आगीत गंभीर भाजल्याची घटना ...

वाळूज महानगर : लाईट गेल्यानंतर सॅनिटायझरच्या बॉटलजवळ पेटती मेणबत्ती ठेवून झोपी गेलेल्या तरुण घराला लागलेल्या आगीत गंभीर भाजल्याची घटना मंगळवार (दि.२२) सायंकाळी रांजणगावात घडली. आगीत होरपळलेल्या राम हरिश्चंद्र दिगे (२८ रा. रांजणगाव) याचा आज बुधवार (दि.२३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, राम हरिश्चंद्र दिगे (२८) हा आई-वडील व पत्नीसह रांजणगावातील भारतनगरात वास्तव्यास असून तो वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतो. काही दिवसापूर्वी राम दिगे याची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्याने राम हा आई ज्योती दिघे व वडील हरिश्चंद्र दिघे यांच्या सोबत वास्तव्यास होता. मंगळवार (दि.२२) सायंकाळी राम दिघे हा घरातील वरच्या रुममध्ये झोपण्यासाठी गेला होता. दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास राम झोपलेल्या खोलीतून धूर बाहेर येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या किरण खांदेभराड यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत खांदेभराड यांनी आरडा-ओरडा करुन दिगे यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी राम याचे आई-वडील, किरण खांदेभरात व गणेश सोळंके यांनी घराच्या वरच्या रुमजवळ जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा आतून बंद असल्याने तसेच धुराचे लोळही खिडकीतून बाहेर येत असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी राम हा गादीवर भाजलेल्या अवस्थेत शेजारी व त्याच्या आई-वडिलांना दिसून आला. यानंतर नागरिकांनी घरातील आग विझवित राम यास पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना आज बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राम दिगे याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ वसंत जिवडे हे करीत आहेत.

चौकट...

पोलिसांनी नोंदविला जबाब

या आगीत भाजलेल्या राम दिगे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात मंगळवारी सायंकाळी लाईट गेल्यामुळे आपण मेणबत्ती पेटवून घरात झोपी गेलो होतो. या मेणबत्तीजवळ सॅनिटायझरची बॉटल असल्याने मेणबत्ती जळत असताना सॅनिटायझरच्या बॉटलला मेणबत्तीच्या ज्वालामुळे आग लागून भडका उडाल्याने आपण भाजल्याचे पोलिसांना सांगितले. तत्पूर्वी मेणबत्ती गादीवर पडल्याने आग लागून घरात मोठा धूर झाला होता. यावेळी गादीवर गाढ झोपेत असलेला राम हा आगीच्या चपाट्यात सापडून भाजला गेला. घरात लाईट नसल्याने तसेच धुरामुळे त्याचा श्वास कोंडल्यामुळे दरवाजा उघडता आला नसल्याचे राम दिगे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.

फोटो क्रमांक- राम दिगे (मयत)

--------------------------------