शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीत येवा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:16 IST

विघ्नहर्त्याचे बोट धरुन आलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे़ शुक्रवारी अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने शनिवारी रात्री नांदेड शहराला तब्बल चार तास झोडपून काढले़ त्यानंतर रविवारी दुपारपासून संततधार सुरुच होती़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली असून सलग दुसºया दिवशी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: विघ्नहर्त्याचे बोट धरुन आलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे़ शुक्रवारी अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने शनिवारी रात्री नांदेड शहराला तब्बल चार तास झोडपून काढले़ त्यानंतर रविवारी दुपारपासून संततधार सुरुच होती़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली असून सलग दुसºया दिवशी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता़२१ आॅगस्टच्या पहाटे नांदेड शहरासह जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती़ मृग नक्षत्रानंतर जवळपास सर्वच नक्षत्र कोरडे गेल्यामुळे तोंडचे पाणी पळालेल्या बळीराजाला मघा नक्षत्राने मोठा दिलासा दिला़ अतिवृष्टीमुळे पिकांना जीवदान मिळाले असून जिल्ह्यातील बहुतेक प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात बºयापैकी वाढ झाली होती़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी- पातळीत वाढ झाल्यामुळे सोमवारी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला होता़ त्यातून ३९६ क्युमेक्सने गोदावरी नदीत विसर्ग करण्यात आला़ सकाळी दहा वाजता हा दरवाजा बंद करण्यात आला होता़ त्यावेळी प्रकल्पात ८० दलघमी साठा उपलब्ध होता़त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती़ विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वी अधूनमधून शहरासह काही भागात पावसाने हजेरी लावली होती़ त्यानंतर शुक्रवारी सर्वत्र गणेशाच्या आगमनाची तयारी सुरु असताना शहरात पाऊसही गणरायाच्या स्वागतासाठी आला होता़ दिवसभर शहरात पावसाची रिपरिप सुरुच होती़विष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाली होती़ त्यामुळे शनिवारी प्रकल्पात ८०़७९ दलघमी एवढा पाणीसाठा झाला होता़ त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून ४१५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ शनिवारी दिवसभर अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने रात्री साडेनऊ वाजेनंतर मात्र चांगलाच जोर धरला होता़रात्री दीड वाजेपर्यंत पावसाने शहराला झोडपून काढले़ त्यानंतर मात्र विश्रांती घेतली़ रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती़ तासभर पडल्यानंतर दुपारी तीन वाजेपासून शहरात संततधार सुरु होती़ दुपारी चार वाजेनंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती़दरम्यान, विष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागातही झालेल्या पावसामुळे रविवारी प्रकल्पात ८०़७९ दलघमी एवढा पाणीसाठा झाला होता़ प्रकल्प १०० टक्के भरल्याने दुपारी ३ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला़ त्यातून ४७१ क्यूमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला़ विष्णूपुरीतून गेले दोन दिवस सलग सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरीचे नदीपात्र खळाळून वाहत होते़