शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

यंदा आंतरपिकावर भर !

By admin | Updated: June 23, 2016 01:17 IST

राजेश खराडे , बीड पारंपारिक पीकपद्धती आणि दरवर्षी कापूस उत्पादनातून होणारे नुकसान टाळण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी मूग, उडीद, तूर यासारख्या आंतरपिकातील कडधान्यावर भर दिला आहे

राजेश खराडे , बीडपारंपारिक पीकपद्धती आणि दरवर्षी कापूस उत्पादनातून होणारे नुकसान टाळण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी मूग, उडीद, तूर यासारख्या आंतरपिकातील कडधान्यावर भर दिला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा आंतरपिक पिक लागवडीच्या बियाणांची मागणी वाढलेली आहे.जिल्ह्यात खरिपात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचेच अधिकचे उत्पादन घेतले जाते. २००४-०५ साली कापसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ६० हजारावर होते गतवर्षी ४ लाख २० हजारावर गेले होते. दहा वर्षाच्या कालावधीत कापसाच्या क्षेत्रात तीपटीने वाढ झाली होती तर कडधान्याच्या उत्पादनात निम्म्याने घट. तब्बल दहा वर्षानंतर शेतकऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होत आहे. सुरवातीच्या काळात मोजक्या शेतकऱ्यांनाच कपाशीतून मोठे उत्पन्न मिळाले, मात्र एकाच पिकाचे सातत्य ठेवल्याने जमिनीचा दर्जा ढासळला शिवाय उत्पादनातही घट होत आहे. गेल्या दोन वर्षापासून कापसातून तर फायदा तर लांबच उत्पादनावर झालेला खर्चही निघेना झाला आहे. यातच हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पीकपद्धतीमध्ये बदल करण्याचे आव्हान कृषिविभागाच्या माध्यमातून केले जात होते, मात्र याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. पर्जन्यमानाच्या अनियमिततेमुळे कापूस अािण सोयाबीन ही पिके बेभरवाशाची झाली आहेत. त्यामुळे दरवर्षी होणारा धोका टाळण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी आंतरपिकावर अधिक भर दिला आहे. पाण्याअभावी एका पिाकचे नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकातून उत्पादन पदरी पाडून घेण्याच्या दृष्टीने मूग, उडीद, तुरीचा पेरा यंदा वाढला आहे. शिवाय कापूस लागवडीने शेतजमिन गुंतून पडत राहते परिणामी रबीकरीता क्षेत्र हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांची मानसिकता बदलत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पेरणीचा टक्का १६ वर गेला आहे. सर्वसाधारण खरीपक्षेत्र ६ लाख ५८ हजार असताना अद्यापर्यंत ९० हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. पैकी ५० हजारावर कापूस, सोयाबीन व उर्वरीत क्षेत्रात कडधान्याची लागवड करण्यात आली आहे. कडधान्यात तुरीच्या जोडीला नगदी पिके म्हणून मूग, उडिद, हुलगे, मटकीचे उत्पादन घेतले जात आहे. गेवराई तालुक्यात बाजरी-तूर- मटकीचे असे तिहेरी पिक लागवडीची पद्धत अवलंबली असल्याचे चित्र आहे.