शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोअर दुधना प्रकल्पात यावर्षी करणार शंभर टक्के जलसाठा

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़

मोहन बोराडे, सेलूनिम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़ गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे प्रकल्प निर्मिती नंतर प्रथमच 60 टक्के पाणीसाठा झाला होता़ सध्या प्रकल्पात एकुण 53 टक्के पाणी साठा असून यातील 34 टक्के जिवंत पाणी साठा आहे़ 30 वर्षा पासून रखडलेल्या निम्न दुधना प्रकल्पाचे काम दोन वर्षापुर्वी पुर्ण झाले होते मात्र प्रकल्पाच्या कालव्यांची व वितरिकांची कामे अद्यापही सुरू आहेत़ त्यामुळे प्रकल्पातील पाणी शहराच्या पाणी पुरवठयासाठी वापरण्यात आले़ गेल्या वर्षी जालना जिल्हयासह निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला त्यामुळे मृतसाठयात असलेल्या प्रकल्पात 60 टक्के पाणी साठा झाला़ त्यामुळे सेलू व परतूर शहराला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे दुधनाच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत गेली त्यामुळे प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला़ या पाणी साठयामुळे सेलू व परतूर शहराला पाणी टंचाई पासून दिलासा मिळाला यावर्षी पावसाळयात पुर्ण क्षमतेने पाणी साठा करण्याची तयारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची आहे़ जालना जिल्हयाच्या पावसावरच दुधना प्रकल्पाची पाण्याची मदार आहे़ जालना जिल्हयात चांगला पाऊस झाला तर प्रकल्पात वेगाने पाणी येते़ गतवर्षी प्रकल्पाच्या क्षेत्रात 900.40 मि़मि़ पावसाची नोंद झालेली आहे़ यावर्षीही चांगला पाऊस झाल्यास प्रकल्प तीन-चार पावसातच भरू शकतो़ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सिंचनासाठी या पाण्याचा वापर होवू शकतो़ प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम पुर्ण झाले आहे़ तर उजव्या कालव्याचे काम सुरू आहे़ यामुळे यावर्षी प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळाले तर ऊस व फळबागेचे क्षेत्र वाढू शकते़ त्यामुळे प्रकल्प शंभर टक्के भरण्याच्या हालचाली सुरू आहेत़ वरूण राजावर प्रकल्पाच्या पाण्याची मदार आहे़ (वार्ताहर)मत्स्य व्यवसायाला चालनानिम्न दुधना प्रकल्पात पाणी असल्यामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळाली आहे़ सेलू व परिसरात मोठया प्रमाणावर मत्स्य व्यवसाय सुरू आहे तसेच इतर शहरातही दुधना प्रकल्पातील माशी पाठविण्यात येत आहे़ शहरात यापुर्वी इतर ठिकाणाहून मत्स्य आणून विक्री केली जात असत परंतु, दुधना प्रकल्पातील माशानाही मागणी वाढली आहे़ दरम्यान पाण्याचा वापर शहराला, सिंचनाला झाला तर शेती व्यवसायाला चांगले दिवस येतील.