शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पॉकेट्समध्येच चिंता!

By admin | Updated: February 5, 2017 00:04 IST

जालना : प्रमुख पक्षांसह इतर छोट्या छोट्या पक्षांनी आघाडी करुन निवडणुकीत चुरस वाढवली आहे.

जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह इतर छोट्या छोट्या पक्षांनी आघाडी करुन निवडणुकीत चुरस वाढवली आहे. असे असले तरी रिंगणात कोण राहतो याचे चित्र ७ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.जिल्हा परिषदेत आपली सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. नाराजांनी बंडाचा झेंडा रोवल्याने अधिकृत उमेदवार अडचणीत आले आहेत. यंदा प्रथमच शिवसेना आणि भाजप युती न झाल्याने दोन्ही पक्षांचे बळ या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली असली तरी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मानसिकता अद्याप आघाडीसाठी तयार झाली नसल्याचे दिसून येते. याचाही फटका आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मंत्र दिला तरच काही चमत्कार घडू शकेल. अन्यथा गटागटात विभागून आघाडीचेच नुकसान होण्याचा अधिक धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक निकालानंतरचे चित्र काय असेल, याचा अंदाज बांधून राजकीय वैर विशिष्ट पातळीपर्यंत ठेवण्याचा नेत्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे दिसून येते. कारण कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. त्यामुळे युती किंवा आघाडी करुनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)