परभणी : येथून जवळच असलेल्या कौडगाव शिवारात एका मजुराचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याची घटना १० जून रोजी घडली़ या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शहरातील जुना पेडगाव रस्त्यावरील नेहरू नगरातील नामदेव वामन साळवे हा कौडगाव शिवारातील सय्यद शकील अखिल यांच्या शेतात सालगडी म्हणून का राहत नाही म्हणून १० जून रोजी रात्री १२़३० वाजेच्या सुमारास शेतात बोलावले़ यावेळी सय्यद शकील सय्यद अखिल, अजीम भाई, ज्ञानेश्वर हरिभाऊ चव्हाण व अन्य एकाने संगनमत करून नामदेव साळवे यास लाथाबुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी केले़ या मारहाणीमध्ये नामदेवचा मृत्यू झाला़ याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आशाबाई नामदेव साळवे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ग्रामीण पोलिसांनी आरोपी सय्यद शकील सय्यद अखिल, ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण या दोघांना अटक केली आहे़ या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)आरोपींना पकडण्यासाठी प्रकाश बोके, शिवाजी चाटे, अशोक पवार, हनुमान कच्छवे, गजेंद्र फुगनगर, संजय शेळके, संजय वळसे, दत्ता चिंचाणे, सुरेश डोंगरे, सखाराम टेकुळे, सुरेश टाकरस, रियाज अहेमद यांचा समावेश होता़
कौडगाव शिवारात मजुराचा खून
By admin | Updated: June 11, 2014 00:20 IST