पालकमंत्री लोणीकर यांनी जिल्हा कचेरीत गुरूवारी एकापाठोपाठ पाच बैठका घेतल्या. परतूर मतदारसंघातील भूसंपादन मावेजा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीही त्यांनी ऐकून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी सभागृहात जमिनीवरच बसले होते. जालना नगरपालिकेअंतर्गत शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीच्या घनकचरा प्रकल्पाचे काम येत्या १५ दिवसात सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री लोणीकर यांनी दिली. जालना शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून हा कचरा उचलण्यासाठी नगरपरिषदेने ५० टक्के व लोकसहभागातून ५० टक्के खर्च करण्यात येणार असल्याचे सांगून नगरपरिषद सक्षम करण्यासाठी उत्पन्न वाढीवर भर देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.‘नियोजन’ ची प्रक्रिया महिनाभरातच४नियोजन मंडळामार्फत वार्षिक आराखड्याअंतर्गत दरवर्षी विविध विभागांना दिला जाणाऱ्या निधीबाबत नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्या सहा महिन्यात कोणतीच प्रक्रिया होत नाही. नंतर अधिकारी, पदाधिकारी हा निधी वेळेत खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या मागे लागतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर शेवटी घाईघाईत कामे आटोपून देयके काढून घेण्याचा प्रयत्न होतो. हा प्रकार यापुढे होणार नाही. त्यासाठी एका महिन्यातच सर्व प्रक्रिया पूर्ण करून निधी खर्च करण्यास सुरूवात करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले.शहरातही शौचालये बांधणार४राज्य शासनाने स्वच्छता विभागासाठी यंदा ७५५ कोटींचा निधी दिला आहे. यापैकी ४५५ कोटींचा निधी ग्रामीण भागासाठी खर्च केला जाणार आहे. तर उर्वरीत ३०० कोटींचा निधी शहरी भागात झोपडपट्टी, कामगार वसाहत अशा भागांमध्ये शौचालये बांधण्यासाठी खर्च केला जाणार आहे. ज्या कुटुंबियांकडे शौचालये नाहीत, त्यांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत.४यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकर चिंचकर, श्रीमंत हरकर, अरविंद लोखंडे, लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे, आनंद गंजेवार, महावितरण औरंगाबादचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण, मुख्य अभियंता म्हस्के, अधीक्षक अभियंता पानढवळे, खंदारे, कार्यकारी अभियंता पवार, पडुरकर, तहसीलदार छाया पवार, रेवननाथ लबडे, लहाने, काळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
घनकचरा प्रकल्पाचे काम १५ दिवसांत भूसंपादनाच्या मावेजासंबंधी आढावा
By admin | Updated: April 17, 2015 00:38 IST