शासनाने नाचनवेल सिमेंट नाला बांध क्र.१ व २, जवखेडा क्र.१ व २, टाकळी क्र १, नादरपूर क्र. १, कोपरवेल क्र. १, पिंपरखेडा क्र. १, वासडी क्र. १, भोकनगाव क्र. १, जळगाव घाट क्र. १, दाभाडी क्र. १, वडनेर क्र. १, २, ३ व ४, अंबाला क्र. १, बोरसर क्र. १ व २, लामणगाव, कोळंबी मक्ता, सासेगाव क्र. १ व २, ब्राह्मणी (कन्नड परिसर) १ व २, हतनूर क्र. १ व २, शिवराई क्र. १ व २, कानडगाव व देवगाव, निमडोंगरी कोल्हापुरी बंधारा क्र. ३ व देभेगाव कोल्हापुरी बंधारा क्र.१ यांना मंजुरी दिली होती. यापैकी कार्यारंभ आदेश नाचनवेल गेटेड सिमेंट नाला बांध क्र. १ व २, जवखेडा क्र. १ व २, टाकळी क्र. १, नादरपूर क्र. १, कोपरवेल क्र. १, पिंपरखेडा क्र. १, वासडी क्र. १, भोकनगाव क्र. १, जळगाव घाट क्र. १, दाभाडी क्र. १, वडनेर क्र. १, २, व ४, अंबाला क्र. १ तर निमडोंगरी कोल्हापुरी बंधारा क्र. ३ व देभेगाव कोल्हापुरी बंधारा क्र. १ या बंधाऱ्यांना मिळालेले आहे. मात्र, शासनाने २ जून २०२१ चे पत्र काढून कार्यारंभ आदेश मिळालेली कामे पुढील आदेश मिळेपर्यंत आहे त्या स्थितीत थांबविण्यात यावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यारंभ आदेश मिळालेली कामे आहे, त्या स्थितीत थांबविण्यात आली, असल्याची माहिती उपअभियंता एस. आर. कुलकर्णी यांनी दिली आहे.
कार्यारंभ आदेश दिलेल्या बंधाऱ्यांची कामे थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST