शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:10 IST

औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट)चे काम सुरू झाले आहे. येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण रस्त्याचे अलायमेंट ठरेल

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट)चे काम सुरू झाले आहे. येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण रस्त्याचे अलायमेंट ठरेल. त्यानंतर गावे, नकाशे तयार होतील. रुंदीकरणाच्या आड येणाºया अडचणींची माहिती त्यानंतर समोर येईल.डीपीआरचे काम करणाºया एजन्सीने प्राथमिक अहवाल दिला आहे. त्यानुसार शहराला पाणीपुरवठा करणाºया ७०० आणि १४०० मि. मी. व्यासाच्या विद्यमान पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीची अडचण आहे. रस्ता चौपदरी करण्यासाठी विद्यमान पाइपलाइन आहे तशीच ठेवणे अथवा भूसंपादन करून स्थलांतरित करणे किंवा रस्त्यासाठी भूसंपादन करणे. यापैकी कुठल्याही एका पर्यायांवर विचार करण्यात येणार आहे.औरंगाबाद ते पैठण हा रस्ता एनएन क्रमांक २११ लगतच असणार आहे. शेंद्रा ते बिडकीन ते वाळूज असा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ४५ कि़मी.पैकी अर्धा रस्ता रिंगरोडदेखील गणला जाईल. डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या ‘इंडस्ट्री ट्रँगल’ साठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा प्रस्ताव नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला असून, ९०० कोटींचा हा प्रकल्प औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव या रस्त्यांसह १९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हे दोन्ही वेगवेगळे रस्ते असताना त्यांचा संयुक्त डीपीआर तयार होत आहे. ९०० कोटींचा शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित आहे. शिवाय औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचेदेखील यात समायोजन झाले आहे. त्यासाठी भूसंपादनासह १ हजार कोटी लागण्याचा अंदाज आहे. सध्या ३० मीटर रुंद तो रस्ता आहे. ३० मीटर नव्याने भूसंपादन केल्यास तो रस्ता नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या निकषाप्रमाणे पूर्ण करता येईल.१९० किलोमीटरच्या कामाला १९०० कोटी रुपये भूसंपादनासह लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, पैठण ते औरंगाबाद डीपीआरचे काम सुरू झाले आहे.