शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

महिला रेल्वे प्रवाशाला विंचूचा दंश

By admin | Updated: June 7, 2017 13:54 IST

सिंकदराबादला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर अजिंठा एक्स्प्रेसची प्रतिक्षा करणा-या एका महिलेला विंचूने दंश केल्याची घटना नगरसोल रेल्वेस्टेशनवर मंगळवारी(दि.६) रात्री घडली.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 06 -  सिंकदराबादला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर अजिंठा एक्स्प्रेसची प्रतिक्षा करणा-या एका महिलेला विंचूने दंश केल्याची घटना नगरसोल रेल्वेस्टेशनवर मंगळवारी(दि.६) रात्री घडली. विंचूच्या दंशानंतरही नगरसोल ते लासूर स्टेशनपर्यंत असह्य वेदना सहन करीत प्रवास करण्याची वेळ या महिलेवर आली. लासूर स्टेशन येथे वैद्यकीय उपचार मिळाल्यानंतर अखेर वेदनेतून सुटका झाली.
एस. हेमावती(२१, रा. सिंकदराबाद) या परिवारातील पाच सदस्यांसह शिर्डी येथे साई दर्शन करून घरी परतण्यासाठी नगरसोल रेल्वेस्टेशनवर ६ जून रोजी रात्री ८ वाजता आल्या होत्या. अजिंठा एक्स्प्रेसमध्ये त्यांचे आरक्षण होते. या ठिकाणी बसण्याची अपु-या व्यवस्थेमुळे उभे राहूनच रेल्वेची प्रतिक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर आली.  बºयाच वेळ उभे रहावे लागल्याने त्या प्लॅटफॉर्मवर बसल्या. याचदरम्यान एका विंचूने एस. हेमावती यांच्या पायाला दंश केला. त्यामुळे त्या जोरात ओरडल्या. तेव्हा आजूबाजूचे प्रवासी त्यांच्याकडे धावले. त्याच वेळी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी आसाराम जुंदरे हे तेथे पोहोचले. तेव्हा त्यांच्या नजरेस विंचू पडला. या रेल्वेस्टेशनवर डॉक्टरची सुविधा होऊ शकत नसल्याने या घटनेची नांदेड नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.
 अशा परिस्थितीत अजिंठा एक्स्प्रेस रेल्वेस्टेशनवर दाखल झाली होती. त्यामुळे  एस. हेमावती असह्य वेदना सहन करीत रेल्वेत बसल्या.  रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना या घटनेची माहिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांनी या रेल्वेला लासूर स्टेशनवर काही मिनिटे थांबविण्याची विनंती रेल्वे अधिकाºयांना केली. त्यास अधिकाºयांनी तात्काळ होकार दिला. या ठिकाणी ही रेल्वे दाखल होताच सज्ज असलेले लासूर येथील डॉ. नंदकुमार उदावंत, डॉ. कृष्णा औटे यांनी सदर महिलेवर तात्काळ वैद्यकीय उपचार केले. उपचारामुळे विंचूच्या दंशामुळे होणाºया वेदना कमी झाल्या. मिळालेल्या सहकार्याबद्दल परिवारातील सदस्यांनी सर्वांचे आभार मानले. रात्री साडेदहा वाजता ही रेल्वे सिकंदराबादसाठी रवाना झाली.
 वैद्यकीय उपचारासाठी  डॉ. नंदकुमार उदावंत, डॉ. कृष्णा औटे यांच्यासह रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, लासूर स्टेशन व्यवस्थापक भगवानसिंग मीना, सीताराम पोलके, टी. टी.ई. धनराज, संतोष काळे, राजेश चव्हाण, विकी ठोले, बाळू शर्मा,सचिन पांडे आदींनी प्रयत्न केले.