शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिला काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन

By admin | Updated: January 10, 2017 00:03 IST

जालना : जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सोमवारी शिवाजी पुतळा परिसरात थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सोमवारी शिवाजी पुतळा परिसरात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला होता. माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महिला काँग्रेसने थाळीनाद आंदोलन करून निषेध नोंदविला. तत्पूर्वी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल, महिला जिल्हाध्यक्षा शीतल तनपुरे, शहराध्यक्ष अब्दुल हफिज, प्रदेश सचिव विजय कामड, शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, विजय चौधरी, राम सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शीतल तनपुरे यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयामुळे सामान्य जनतेला दैनंदिन व्यवहार करताना कशी अडचण येत आहे, त्याचबरोबर जनता कशी कंटाळली आहे बाबत सविस्तर माहिती दिली. माजी आ. कैलास गोरंट्याल, प्रदेश सचिव विजय कामड, शहराध्यख अब्दुल हफिज, माजी शहराध्यक्ष शेख महेमूद, सुषमा पायगव्हाणे, चंदाताई भांगडिया यांनी भाषणातून मोदी सरकारचा निषेध केला. याप्रसंगी इतर पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी नगरसेविका संगीता पाजगे, छाया वाघमारे, प्रीती कोताकोंडा, मीनाक्षी खरात, पुनम भगत, सुमन हिवराळे, संध्या देठे, लक्ष्मीबाई जगदाळे, मथुराबाई सोळुंके, शकीलाखान, बिलकीस बेगम, मंगल खांडेभराड, निमाबाई सले, बदर चाऊस, अंकुश राऊत, महावीर ढक्का, शेख नजीब अहमद, रमेश गौरक्षक, राजेंद्र वाघमारे, जावेद अली, गणेश शेलार, मोहन इंगळे, शेख जावेद, ज्ञानेश्वर उगले, वाजेद खान, जगदीश भरतिया, विनोद रत्नपारखे, अरूण सरदार, शेख इरशाद, संजय भगत यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.