शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तान्ह्या बाळाला पाळण्यात सोडून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 17:51 IST

रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणा-या लोकांना दिल्लीगेटच्या बाजूने सलीम अली सरोवरमध्ये अनोळखी महिलेचे प्रेत आढळले होते. आत्महत्या केलेल्या महिलेने सहा महिन्याच्या तान्हुल्या बाळाला पाळण्यात ठेवून घरगुती कारणावरुन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

ठळक मुद्दे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणा-या लोकांना दिल्लीगेटच्या बाजूने सलीम अली सरोवरमध्ये अनोळखी महिलेचे प्रेत आढळले होते.तपासादरम्यान अयोध्यानगर येथून घरातून गायब झालेल्या अंजना यांचे हे प्रेत असल्याचे समोर आले.घरगुती कारणावरुन अंजना आणि त्यांच्या सासरच्या लोकामध्ये वाद होत.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ३० : सलीम अली सरोवरमध्ये रविवारी (दि. 30 ) सकाळी प्रेत आढळलेल्या महिलेची ओळख पटविण्यात सिडको पोलिसांना यश आले. आत्महत्या केलेल्या महिलेने सहा महिन्याच्या तान्हुल्या बाळाला पाळण्यात ठेवून घरगुती कारणावरुन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

अंजना दत्ता वाडेकर(२७,रा. आयोध्यानगर, सिडको)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याविषयी सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणा-या लोकांना दिल्लीगेटच्या बाजूने सलीम अली सरोवरमध्ये अनोळखी महिलेचे प्रेत आढळले होते. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस हेड कॉन्स्टेबल हमीद यांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान अयोध्यानगर येथून घरातून गायब झालेल्या अंजना यांचे हे प्रेत असल्याचे समोर आले.

अंजना यांचा पती खाजगी विमा कंपनीत कामाला आहे. सात वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना पाच वर्षाची मुलगी आणि ६ महिन्याचा मुलगा आहे. घरगुती कारणावरुन अंजना आणि त्यांच्या सासरच्या लोकामध्ये वाद होत. या वादातून दोन दिवसापूर्वी अंजना हिने तिच्या चिमुकल्या बाळाला पाळण्यात झोपू घातले आणि त्यानंतर ती घराबाहेर पडली. तेथून ती थेट सलीम अली सरोवरावर गेली. सरोवराच्या काठावर चप्पल उतरून तिने थेट पाण्यात उडी मारून मृत्यूला कवटाळले.

दुस-या रविवारी सकाळी दिवशी तिचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. इकडे अचानक घरातून गायब झालेली अंजना रागाच्या भरात माहेरी गेली असेल,असे समजून तिच्या तिच्या पतीने सासुरवाडी आणि अन्य ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र ती त्यांना कोठेच आढळली नव्हती. आज ते पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेले  असता पोलिसांनी त्यांना सलीमअली सरोवरात सापडलेले प्रेत पाहून घ्या,असा सल्ला दिला. नातेवाईकांनी घाटीत जाऊन प्रेत पाहिले आणि हंबरडा फोडला. अंजना हिचेच ते प्रेत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. नंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले.