शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

स्त्रीची वाट आजही बिकटच !

By admin | Updated: January 19, 2015 00:55 IST

आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरी : राजकारणात स्वतंत्रपणे उभे राहू पाहणाऱ्या स्त्रीची वाट आजही मोठी अवघड आहे. स्त्रीने फारतर जिल्हा परिषद वा नगरपालिकेची निवडणूक लढवावी.

आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरी : राजकारणात स्वतंत्रपणे उभे राहू पाहणाऱ्या स्त्रीची वाट आजही मोठी अवघड आहे. स्त्रीने फारतर जिल्हा परिषद वा नगरपालिकेची निवडणूक लढवावी. त्यापुढे मजल मारली तर आम्ही पाहून घेऊ, अशी पुरुषी मनोवृत्ती तिचे पंख कापायला तयार असते. तिच्या चारित्र्यावर घाला घातला की ती मागे सरकते. संपत्ती व बळाचे विकृत डावपेच खेळता येत नसल्याने स्त्री मोडून पडते. एकहाती सत्तेमुळे आज राजकारणाचा पोत बिघडतो आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी प्रकट मुलाखतीदरम्यान सध्याच्या राजकारणावर आसूड ओढले. सहाव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सूर्यकांता पाटील यांनी आपला जीवनपट रसिकांसमोर उलगडला. या दिलखुलास मुलाखतीत ‘लोकराज्य’ मासिकाच्या माजी संपादक श्रद्धा बेलसरे-खारकर व कवयित्री सुमती लांडे यांनी त्यांना बोलते केले. बालपणीचा काळ जागवताना पाटील म्हणाल्या, ‘माझे वडिल जयवंतराव पाटील हे निजाम कासीम रजवी याच्याशी झालेल्या लढाईत हुतात्मा झाले. त्यांच्या मृत्यूनंतर तीस दिवसांनी माझा जन्म झाला. मी स्वातंत्र्यसैनिकाची लेक आहे. मोहिमेवर जाताना वडिल आईला म्हणाले होते, ‘मला मुलगी होईल. तिचं नाव सूर्यकांता ठेव. त्याप्रमाणे माझे नाव ठेवले गेले. घरात गेल्या शंभर वर्षांपासून सुधारक वातावरण होते. मी घोडीवर बसून शाळेत जायचे. त्यामुळे तेव्हापासूनच मांड पक्की आहे!’ त्यांच्या या सूचक वाक्याला श्रोत्यांनी उस्फूर्त दाद दिली. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण, वैवाहिक जीवनाचा प्रवास सांगितला. व्यापक राजकारणात उतरताना पतीसह घरच्यांचा झालेला विरोध, त्याला तोंड देत केलेला नगरसेवक ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास, बाईपणाचे अडथळे ओलांडण्याची शर्यत, अशा अनेक बाबींवर त्यांनी टाकलेला प्रकाश भारावून टाकणारा ठरला. ‘माझा संघर्ष आठवताना ‘मदर इंडिया’ चित्रपटातील नर्गिस मला आठवते. जीवापाड कष्ट करुन साकारलेल्या जगापासून एका क्षणी सहजपणे अलिप्त होणारी! तशी आज मी राजकीय जीवनातून विचारीपणे बाजूला झाले आहे. या सेकंड इनिंगमध्ये गृहवासी होत सुना-नातवांमध्ये रमते आहे! संसारीपणाचा आनंद अनुभवते आहे.’ सध्याच्या राजकारणातील संक्रमणांवर भाष्य करताना त्यांनी सध्या बळावत असलेल्या मनी-मसल पॉवरबाबत खंत व्यक्त केली. राजकारणात उत्तुंग शिखर गाठले असले तरी मी शेवटी शेतकऱ्याची मुलगी आहे. वावरात फुलून आलेल्या पीकावर कीड पडली तरी मडक्यात शिल्लक असलेल्या अस्सल बियाण्यांवर शेतकऱ्याचा विश्वास असतो. त्याच्या बळावरच पुन्हा जोमात अंकुर उगवून येतात. तसेच आजचे राजकारण बहुतांशी भ्रष्ट झालेले असले तरी काही नवे तरुणच त्याला विधायक वळण देतील, स्वराज्याचे सुराज्य करतील, असा मला मनोमन विश्वास वाटतो, असा आशावाद सूर्यकांता पाटील यांनी व्यक्त केला.एका हळव्या क्षणी सूर्यकांताताई बोलत्या की वडिलांच्या मृत्यूनंतर आईला कॉग्रेस (आय) ने तिकीट दिले. निवडणुकीत ती जिंकली. पण आता विधानसभेत म्हणून ती आमदार म्हणून जाण्याआधी मला जाणवले, आई तर निरक्षर आहे! आता ती कार्यकाळादरम्यान अंगठा उमटवणार. मला असे होणे मान्य नव्हते. मग मी तिला जिद्देसही शिकवली. तीही शिकली आणि झोकात सही करु लागली. एका आईची तिची मुलगीच विद्यापीठ बनली!