शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावातून दोन मुलांसह महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:02 IST

-------------------- किड्‌स कॅम्ब्रिज शाळेत मराठी दिन साजरा वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील किड्स कॅम्ब्रिज स्कूलमध्ये मराठी राज्यभाषा दिन ...

--------------------

किड्‌स कॅम्ब्रिज शाळेत मराठी दिन साजरा

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील किड्स कॅम्ब्रिज स्कूलमध्ये मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका निर्मला म्हस्के, सरला रोडगे, शालू गोठारिया, मानवी शेवाळे, अमृता जगताप, केतकी वावरे, अभिषेक गायकवाड आदींची उपस्थिती होती.

--------------------

कमळापूर फाट्यावर वाहतुकीची कोंडी

वाळूज महानगर : रांजणगावातील कमळापूर फाट्यावर वाढत्या अतिक्रमणामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. या फाट्यावर विविध छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी वाहनधारक व नागरिकांना दररोज वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुध्द कारवाई होत नसल्याने वाहनधारक व नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

-----------------

बजाजनगरात मोकाट जनावरांचा धुडगूस

वाळूज महानगर : बजाजनगरात मोकाट जनावरांचा नागरी वसाहतीत धुडगूस सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोकाट जनावरे सोसायटीत शिरकाव करून घरासमोरील बागा व झाडांची नासधूस करीत असतात. या जनावरांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास जनावरे अंगावर धावून जात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

----------------------

साऊथ सिटीत अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

वाळूज महानगर : साऊथ सिटीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. या नागरी वसाहतीत बहुतांश कच्चे रस्ते असून रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्डयांत वाहने आदळत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिक व वाहनधारकांत असंतोषाचे वातावरण आहे.

--------------------------