शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

वादळी वारे अन् गारपिटीचा तडाखा

By admin | Updated: May 22, 2014 00:13 IST

उमरगा : वादळी वार्‍यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यातील हंद्राळ, कदमापूर, दुधनाळ या गावांतील शेकडो घरावरील पत्रे उडून गेले आहेत

उमरगा : वादळी वार्‍यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यातील हंद्राळ, कदमापूर, दुधनाळ या गावांतील शेकडो घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच विद्युत खांबही कोसळले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. गारांचा मार लागल्यामुळे तीन जण जखमी झाले. तसेच पत्रे लागून जनावरेही जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दुधनाळ, कदमापूर, हंद्राळ, कुन्हाळी या गावांमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस झाला. क्षणार्धातच अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे या भागातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. हंद्राळ हे सुमारे एक हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील जवळपास अडीचशे घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे पावसाचे पाणी घरात जाऊन धान्यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाराही भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे पशुपालकांनी सांगितले. दरम्यान, हंद्राळ परिसरात गारपीटही झाली. गारांचा मार लागून येथील मुकींद बोयणे, रघुनाथ सुरवसे, पंढरीनाथ हत्तरगे हे तिघेजण जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी व्यंकट कुंभार, बंडाप्पा मलकाप्पा बिराजदार, दत्तात्रय लिंबाजी हत्तरगे यांची जनावरे जखमी झाली आहेत. सदरील घटनेचा पंचनामा तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी विजय पाटील, तलाठी शिवराज पाटील, ग्रामसेवक गोपाळ घंटे, कृषी सहाय्यक सचिन सरपे यांनी बुधवारी दिवसभर नुकसानीचे पंचनामे केले. (वार्ताहर) दीडशे झाडे उन्मळून पडली वादळी वार्‍यामुळे तिन्ही गावांतील मिळून सुमारे दीडशे झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणचे विद्युतखांबही जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे सदरील गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासोबतच दळण-कांडपाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेकडो संसार उघड्यावर वादळी वार्‍यामुळे उडून गेलेल्या पत्र्यांची बुधवारी दिवसभर ग्रामस्थ दिवसभर जमवाजमव करताना दिसून येत होते. उडून गेलेल्यापैकी अर्धेही पत्रे हाती लागले नसल्याचे हंद्राळचे सरपंच रमेश हत्तरगे यांनी सांगितले. रात्री उशिरा झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. जिवाच्या भीतीने गावातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. या भीतीपोटी ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.मंगळवारी रात्री गारपीट झाली होती. त्यामुळे सर्वत्र गाराच गारा साचल्या होत्या. सदरील गारांचे ढीग बुधवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत दिसून येत होते. कालांतराने उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर गारा वितळल्या, असे ग्रामस्थांनी सांगितले.