शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 01:02 IST

जालना : लग्नात सासरकडील मंडळींनी ड्रेसचे पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जालना : लग्नात सासरकडील मंडळींनी ड्रेसचे पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जाकेर बेग रहेमान बेग असे आरोपीचे नाव आहे.भोकरदन येथील शासकीय बांधकाम विभागाचा कर्मचारी असलेला जाकेर बेग याचा विवाह १२ जानेवारी २०१४ रोजी आतीयाबी यांच्याशी झाला होता. लग्नात सासरच्या मंडळीने ड्रेसचे पैसे दिले नाहीत. माहेरवरून पैसे आणले नाहीत या कारणावरून आतियाबी यांच्याशी वारंवार वाद करून मारहाण करत होता. परंतु विवाहाला दोन महिने होत नाहीत तोच १२ मार्च रोजी शासकीय निवासस्थानी जाकेर बेग याने पत्नी आतियाबीला पाईपने मारहाण करून तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. भोकरदन पोलीस ठाण्यात पती जाकेर विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.एकूण १२ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. साक्षीपुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून आणि वैद्यकीय अहवाल याचा आधार घेऊन अप्पर सत्र न्यायाधीश अनघा रोट्टे यांनी आरोपी जाकेर बेग याला जन्मठेपची शिक्षा तसेच १० हजार रूपये दंड ठोठावला. सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील दीपक कोल्हे यांनी काम पाहिले.